Arvind Sawant on Shaina NC : मतदानाची तारीख जवळ येत असल्याने प्रचारसभांचा धडाका लागला आहे. उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. तर स्टारप्रचारक उमेदवारांच्या मतदारसंघात जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. यादरम्यान, माध्यमांना प्रतिक्रिया देताना आरोप-प्रत्यारोपांना उत आलाय. यातच अरविंद सावंत यांनी शायना एन. सी यांच्यावर टीका करताना अपशब्दाचा वापर केल्याचा दावा केला जातोय. यावर आता अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

नेमकं प्रकरण काय?

मुंबादेवी मतदारसंघातून काँग्रेसच्या अमिन पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा प्रचार करण्याकरता अरविंद सावंत २९ ऑक्टोबर रोजी त्यांच्या मतदारसंघात गेले होते. शायना एन. सी याआधी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक होत्या. परंतु, त्यांना मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. याबाबत बोलताना अरविंद सावंत म्हणाले, “त्यांची अवस्था पहा. त्या आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि आता शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात आल्या. पण इथे इम्पोर्टेड चालत नाही. आमच्या इथे ओरिजनल माल चालतो.”

Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
ajit pawar bjp seat sharing assembly election
महायुतीत भाजपा मोठा भाऊ होतेय? अजित पवार प्रश्नावर म्हणाले, “आमचं सहमतीनं…”
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
uddhav thackeray sada sarvankar
Sada Sarvankar : “आपलं अंगण सोडून दुसऱ्याच्या…”, सदा सरवणकरांच्या ‘त्या’ पोस्टवरून ठाकरेंच्या शिवसेनेचा चिमटा

अरविंद सावंत यांनी वापरलेल्या माल या शब्दावर त्यांनी आक्षेप घेतला आणि त्यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या, “त्यांच्या पक्षाची विचारधारा यामुळे स्पष्ट होतेय. ते एका महिलेला माल म्हणतात. मी त्यांना विचारू इच्छिते की मुंबादेवीची प्रत्येक महिला माल आहे का? २०१९, २०१४ ला ते मोदींचं नाव लावून जिंकून आले आहेत. त्यांची सुरुवात तिथून झाली. आज २०२४ च्या निवडणुकीत ते मला माल म्हणतात. त्यांची मनस्थिती यामुळे स्पष्ट होते. त्यांच्या पक्षाचे नेतृत्त्व का गप्प आहेत? उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांनी आता बोललं पाहिजे.”

हेही वाचा >> Shaina NC : अरविंद सावंत यांची जीभ घसरली; अपशब्द वापरल्याने शायना एन. सी. संतापल्या, म्हणाल्या, “महिलेला…”

u

अरविंद सावंत काय म्हणाले?

माल या शब्दावरून आकांडतांडव झाल्यानंतर अरविंद सावंत यांनी त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, ‘५० वर्षांच्या कारकि‍र्दीत महिलांचा बुहमान करणारा माझ्याइतका माणूस नाही. माझ्यासारख्या क्षेत्रात असंख्य महिला असतात. मी कधी आयुष्यात अवमानकारक शब्द वापरत नाही. मी जे बोललो ते हिंदीतलं वक्तव्य आहे. मालला इंग्रजीत गुड्स म्हणतात. शायना एनसी माझी जुनी मैत्रीण आहे. ती माझी शत्रू नाही. पण प्रश्न असा येतो की त्यांना हे नरेटिव्ह सेट करायला कोणी शिकवलं? मी दोन दिवसांपूर्वी हे बोललो आहे. त्यांच्या आता लक्षात आलंय. मी कोणाचाच अवमान करणार नाही.”

“मी फक्त त्यांनाच नाही तर आमच्या उमेदवारालाही बोललो आहे. आमचा ओरिजनल माल आहे, असं मी बोललोय. त्यामुळे त्या शब्दाचा अर्थ काढण्याचा प्रयत्न केला जातोय, तो असफल होईल”, असं अरविंद सावंत म्हणाले.

Story img Loader