केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने अलीकडेच मुंबई एनसीबीचे माजी विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणातून वगळण्यासाठी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानच्या मॅनेजरकडे २५ कोटींची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी सीबीआयकडून सखोल चौकशी सुरू असून याबाबतचे अनेक खुलासे समोर येत आहेत. शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांच्या साक्षीमुळेच समीर वानखेडे सीबीआयच्या जाळ्यात अडकले आहेत.
कॉर्डेलिया क्रूझवरील छापेमारी आणि आर्यन खानची अटक यानंतर शाहरुखच्या मॅनेजरने एनसीबीच्या तपास अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच टोकन म्हणून ५० लाखांची रोकड दिल्याचा आरोपही तिने केला होता. याप्रकरणी गेल्या वर्षी १६ जून रोजी पूजा ददलानी यांचा जबाब नोंदवून घेतला होता. ददलानी यांचा जबाब हा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या दक्षता अहवालाचा भाग आहे. ददलानी यांनी दिलेल्या साक्षीमुळेच एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे सीबीआयच्या जाळ्यात अडकले.
शाहरुख खानच्या पूजा ददलानी यांनी कॉर्डेलिया छाप्याच्या काही तासांनंतर कथित खंडणी प्रकरणात टोकन रक्कम म्हणून ५० लाख रुपये असलेली बॅग तपास अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप केला होता. त्यांचा हा आरोप आणि त्यांनी नोंदवलेला जबाब यामुळे समीर वानखेडे सीबीआयच्या कचाट्यात सापडले.
एनसीबीच्या तपासानुसार, आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणातून वगळण्यासाठी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला २५ कोटींची लाच मागितली होती. त्यानंतर हा सौदा १८ कोटी रुपयांमध्ये ठरवला. शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी यांनी टोकन रक्कम म्हणून ५० लाख रुपये तपास अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप आहे.