गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला दररोज वेगवेगळं वळण लागताना दिसत आहे. अनेक जणांचं नाव यासंदर्भात जोडलं जात आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दररोज नवनवे आरोप करत अनेकांवर निशाणा साधला आहे. त्यातलेच एक म्हणजे मोहित भारतीय(कम्बोज). सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला हिंदुस्तानी भाऊ आता मोहित भारतीय यांच्या समर्थनार्थ उतरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिंदुस्तानी भाऊने नवाब मलिकांना विरोध करत भारतीय यांना पाठिंबा दिला आहे. भारतीय यांनी हिंदुस्तानी भाऊचा एक व्हिडिओ आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत तो म्हणतो, मोहित कम्बोज तुम्ही खूप चांगलं काम करत आहात. तुम्ही नशेडी, गंजेडी लोकांविरोधात जे आंदोलन उभं केलं आहे, जे पाऊल उचललं आहे त्याला माझा पाठिंबा आहे. मी तुमच्यासोबत आहे.

नवाब मलिक यांनी मोहित भारतीय(कम्बोज) यांच्यावर ११०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. आर्यन खानचं अपहरण करुन खंडणी वसूल करण्याचा त्याचा प्लॅन होता, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. मलिकांच्या या आरोपाला कम्बोज यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. मलिक वैफल्यातून हे सगळं करत असल्याची टीका त्यांनी केली होती.

कोण आहे हिंदुस्तानी भाऊ?

विकास जयराम पाठक ही मुंबईकर व्यक्ती हिंदुस्तानी भाऊ म्हणून सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध आहे. त्याची तरुणाईमध्ये चांगलीच क्रेझ आहे. बिग बॉस या रिऍलिटी शोमध्येही त्याची निवड झाली होती.