महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात बॅडमिंटन खेळाडूंसमोर मजेशीर भाषण केलं. यावेळी त्यांनी त्यांच्या जुन्या दिवसांची आठवण काढली. तसंच, याबरोबर त्यांनी राजकीय फटकेबाजीही केली आहे. “मला एका गोष्टीचं नवल वाटतं की हातात काही द्यायचं नाही आणि अपेक्षा माझ्याकडून ठेवायच्या. एकदा का हातामध्ये सगळं द्या, मग बघा मी कसं सगळं हाणतो”, असं उपहासात्मक राज ठाकरे यांनी टीप्पणी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“बॅडमिंटन या एका खेळावर माझं नितांत प्रेम आहे. १५-२० वर्षे मी बॅडमिंटन खेळलो. व्यसन असावं तसं मी बॅडमिंटन खेळलो आहे. सकाळी सहा-साडेसात वाजता जायचो आणि रात्री ११-१२ ला जेवायच्या वेळेला मी यायचो. बॅडमिंटन सोडलं आणि टेनिस सुरू केलं. एकदा आजारपणात विकनेस आला होता, तेव्हा मी पडलो आणि हात फ्रॅक्चर झाला. हाताचं फ्रॅक्चर बरं झालं, पण कमरेच्या इथे दुखायला लागलं”, असंही राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >> “…तर जनतेला त्यांच्या पेकाटात लाथ घालावीच लागेल”, धारावीतून उद्धव ठाकरेंचा पुन्हा एल्गार

बॅडमिंटनसाठी शक्य ते सगळं करेन

ते पुढे म्हणाले, हिप रिप्लेसमेंट केल्यानंतर वजन वाढलं. दीड – पावणे दोन वर्षे व्यायाम वगैरे काही नव्हतं. त्यामुळे टेनिस सुटलं. पण आता टेनिस सुरू झालेलं आहे. पुण्यात बॅडमिंटनसाठी जे जे करता येईल, ते मी महाराष्ट्रासाठी आणि पुण्यासाठी नक्की करेन. कारण तो जिव्हाळ्याचा विषय आहे. पण पुण्यात सध्या काय गेम सुरू आहे माहीत नाही मला”, असंही राज ठाकरे म्हणाले.

बॅडमिंटनपेक्षा कॅरम का नाही खेळत?

“ज्यांचे गेम चालू आहेत त्यांना सांगून उपयोगाचं नाही. कारण दिसली जमीन की विक हे एकमेव धोरण घेऊन पुढे जातात त्यांना हे बॅडमिंटनचं कोर्ट दाखवलं तर एवढी जमीन मोकळी का, असं ते विचारू शकतात. त्यामुळे बॅडमिंटनपेक्षा कॅरम का खेळत नाही हे ते विचारू शकतात?” असाही उपहासात्मक टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा >> “मी जय श्रीराम नक्कीच म्हणेन, पण…”, अमोल कोल्हे लोकसभेत कडाडले, मराठी भाषेतील काव्यात्मक भाषण चर्चेत!

“मी पुण्यात जन्माला आलो असतो तर मी बॅडमिंटन खेळलो असतो. मुंबईत क्रिकेटचं खूप काही आहे. मी ज्या शिवाजी पार्कला राहतो त्याच्या एका लेनवर पाच टेनिस कोर्ट्स आहेत. पण मला समजत नाही की आम्हाला बॅडमिंटन खेळायला का प्रवृत्त केलं नाही? मी बॅडमिंटन खेळायला लागलो तेव्हा मला वाटलं की इतकी वर्षे हा खेळ का खेळलो नाही”, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: As if i was addicted raj thackeray reminisced this game had to be abandoned due to hand fracture sgk