सांगली : कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडल्याने पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची स्थिती गंभीर झाल्याने कोयना धरणातून कृष्णा नदीत पाणी सोडण्यासाठी आमदार अरुण लाड यांनी मागणी केली होती. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक घेतली. या मागणीची दखल घेत आज कोयना धरणातून १०५० क्यूसेक पाणी नदी पात्रता सोडण्यात आले.

कोरडी पडलेल्या कृष्णा नदीने नागरिक हैराण होते. पाण्याविना पिके दुपार धरू लागली होती. पिण्याच्या पाण्याचेही दुर्भिक्ष झाले असताना आमदार लाड यांनी जिल्हाधिकरी डॉ. राजा दयानिधी यांना तातडीची बैठक बोलावण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात कोयना धरण अधिकारी, पाट बंधारे अधिकारी यांची बैठक पार पडली. पायथा विद्युत गृहातील एका युनिटमधून शनिवारी दुपारपासून १०५० क्यूसेक्स पाणी नदी पात्रात वीज निर्मिती करून सिंचनासाठी सोडण्यात आले.

हेही वाचा – बावनकुळे म्हणतात, “वडेट्टीवार उद्या काय बोलायचे आहे ते रात्रीच लिहून ठेवतात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – “देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला, पण…”, मुख्यमंत्र्यांची महाविकास आघाडीवर टीका

कोयनेतून सोडण्यात आलेले पाणी सांगली जिल्ह्यात यायला दोन दिवस लागतील असे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी सांगितले.