Adani-Tower chip plant in Maharashtra: दोन महिन्यांनी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने काही प्रकल्पांची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने नुकतीच उच्च तंत्रज्ञानावर आधारित सेमीकंटक्टर निर्मितीसाठी पनवेलमध्ये ‘टॉवर सेमीकंडक्टर कंपनी’ आणि ‘अदाणी समूहा’च्या संयुक्त प्रकल्पाची घोषणा केली. या प्रकल्पात १० अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार असल्याचे सांगितले जाते.

केंद्र सरकारची मान्यता बाकी

दरम्यान राज्य सरकारने या प्रकल्पाला मंजूरी दिली असली तरी केंद्र सरकारने प्रकल्पाच्या अनुदानाला अद्याप मान्यता दिलेली नाही. इस्रायलची ‘टॉवर सेमीकंडक्टर कंपनी’ आणि ‘अदानी समूहा’च्या सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्पाला ७६ हजार कोटींचे अनुदान अपेक्षित आहे. यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज करण्यात आला असून त्याला मान्यता मिळणे बाकी असल्याचे द इंडियन एक्सप्रेसने आपल्या वृत्तात म्हटले आहे. जोपर्यंत केंद्र सरकारची मान्यता मिळणार नाही, तोपर्यंत प्रकल्पाचे काम सुरू होणे शक्य नसल्याचे सांगितले जाते.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
union home minister amit shah slams sharad pawar
‘पवारांच्या कारकिर्दीत राज्यातील १०० साखर कारखाने मृत्युपंथाला’, अमित शहा यांचा हल्लाबोल
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच
tension in malad aksa village over rehabilitation of ineligible residents of dharavi
जमीन मोजणीला विरोध; अपात्र धारावीकरांच्या पुनर्वसनावरून मालाड अक्सा गावात तणाव
Resolution to grant special status to Jammu and Kashmir approved
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा ठराव मंजूर; विधानसभेत जोरदार खडाजंगी

हे वाचा >> चार विशाल प्रकल्पांना मान्यता; एक लाख १७ हजार २२० कोटींची गुंतवणूक

पनवेलमध्ये प्रस्तावित प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ५८ हजार ७६३ कोटी तर दुसऱ्या टप्यात २५ हजार १८४ कोटी अशी एकूण ८३ हजार ९४७ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून तेथे १५ हजार रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा राज्य सरकारला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, या प्रकल्पातून विविध प्रकारच्या चिप निर्मितीला प्राधान्य दिले जाईल. प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला ४० हजार वेफर्स (सिलिकॉन मटेरिलयचे सेमिकंडक्टर उत्पादन) उत्पादित केले जातील. तर दुसऱ्या टप्प्यात प्रति महिना ८० हजार वेफर्स उत्पादित केले जातील.

केंद्र सरकारकडून अद्याप मान्यता बाकी

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या (MeitY) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, टॉवर आणि अदानीच्या सेमीकंडक्टर प्रकल्पाला अद्याप मान्यता दिलेली नाही. परंतु दोन्ही कंपनीने केंद्र सरकारच्या भारत सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत ७६ हजार कोटींच्या अनुदानासाठी अर्ज केलेला आहे.

हे ही वाचा >> पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, MeitY ने अद्याप अनुदानाच्या अर्जाला मान्यता दिलेली नाही. तो अर्ज सध्या आमच्याकडे असून आम्ही त्याची तपासणी करत आहोत. द इंडियन एक्सप्रेसने फेब्रुवारी महिन्यात सर्वात आधी हे वृत्त दिले होते. इस्रायलमधील टॉवर सेमिकंडक्टरने भारतात ८ ते १० अब्ज डॉलरच्या प्रकल्पाची उभारणी करण्याची योजना आखली होती. याआधीही टॉवर कंपनीने अनुदान मागण्यासाठी अर्ज सादर केला होता. मात्र नंतर इंटेलमध्ये विलीनीकरण होणार असल्यामुळे कंपनीनेच केंद्राला या अर्जावर विचार करू नये, असे सांगितले होते.