सांगली : पोटदुखीने त्रस्त असणाऱ्या सांगोल्यातील एका रुग्णाच्या मूत्रपिंडामध्ये तब्बल ३५० ग्रॅम वजनाचा ८.२ सेंटीमीटर लांब, ४.६ सेंटीमीटर रुंदीचा मुतखडा मिरजेच्या डॉ. निखिल पाटील यांनी शस्त्रक्रिया करून काढला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना के. चंद्रशेखर राव यांच्या ‘भारत राष्ट्र समिती’ची भुरळ

हेही वाचा – नाना पटोलेंना मुख्यमंत्र्यांकडून महिन्याला एका खोका मिळतो? आशीष देशमुखांचे गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले

कुपवाडनजीक बामणोलीतील विवेकानंद रुग्णालयात उदरशूळाने बेजार झालेला रुग्ण उपचारासाठी दाखल झाला होता. तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. कारण डॉक्टरांना त्याच्या किडनीमध्ये तब्बल ८.२ × ४.६ × ३.९ सेंटीमीटर एवढ्या मोठ्या आकाराचा मुतखडा असल्याचे आढळून आले. मिरज येथील मातृसेवा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे यूरोलॉजिस्ट डॉ. निखिल पाटील यांनी या रुग्णावर बामणोली येथील स्वामी विवेकानंद रुग्णालयात शस्त्रक्रिया करून त्याच्या मुत्रपिंडातून मुतखडा यशस्वीरित्या बाहेर काढला. त्याचे वजन तब्बल ३५० ग्रॅम भरले. या शस्त्रक्रियेसाठी सर्जन डॉ. निखिल पाटील यांना डॉ. राम लाडे, भुलतज्ञ डॉ. अमृता पाटील, भारती कदम व कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.