खासदार असदुद्दीन ओवेसींची दपरेक्ती; इशरत जहाँ, हिमायत बेगला पािठबा
इशरत जहाँ, हिमायत बेग हे दोघे अतिरेकी नसून त्यांना आपला पूर्ण पािठबा आहे, असे सांगत आपण ‘भारत माता की जय’ असे म्हणणार नाही, अशी दर्पोक्ती एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली.
उदगीर येथे एमआयएमच्यावतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार इम्तियाज जलील, कोअर कमिटीचे सदस्य अॅड. महंमद अली, विलास डोंगरे, अॅड. पंडित बोर्डे यांची या वेळी उपस्थिती होती. काँग्रेसचे माजी नगरसेवक सय्यद साहेर हुसेन यांच्या एमआयएम प्रवेशानिमित्त या सभेचे आयोजन केले होते. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या चुकीमुळे भाजपचे सरकार सत्तेत आले आहे. या सत्तेमुळे जनतेवर अन्याय-अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मोदी सरकारच्या काळात िहसाचार व दंगली झाल्या, तेवढय़ा कधीही झाल्या नाहीत. काँग्रेस व राष्ट्रवादी हे दलित आणि मुस्लिम यांचे शोषण करणारे पक्ष आहेत. मुस्लिमांना मोठे होऊ न देण्याचे पाप त्यांनी केले. दलित, मुस्लिम व उपेक्षितांना एकसंध करण्याचा मी प्रयत्न करतो. हे राष्ट्रविरोधी कार्य असेल तर मी हे कार्य करतो व करीत राहणार, असेही त्यांनी ठणकावले.
‘जाटांसारखे आंदोलन हवे’
आरक्षणासंदर्भात जाट समाजासारखे आंदोलन करण्याची गरज आहे. मुस्लिम समाज शांतताप्रिय मार्गाने भांडत आहे. त्यांना आरक्षण दिले जात नाही. स्वातंत्र्यलढय़ात मुस्लिम समाजाने दिलेले योगदान मोठे आहे, असे सांगून ओवेसी म्हणाले की, िहदुस्थान ही कोणाच्या बापाची जहागीर नाही. भारत माता की जय असे मी कधी म्हणणार नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेत असा कुठेही उल्लेख नाही, त्यामुळे मी काहीही झाले तरी तसे म्हणणार नाही, असे सांगितले. माजी नगरसेवक साहेर हुसेन यांनी प्रास्ताविक केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा