नवनीत राणा आणि रवी राणा या राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केली होती. मात्र, हे आंदोलन त्यांना आधीच आटोपतं घ्यावं लागलं. यानंतर त्यांना अटक देखील झाली. मात्र, या मुद्द्यावरून सध्या राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा पठण या मुद्द्यावरून वाद सुरू झालेला असताना आता त्यावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीमध्ये सहभाग घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना ओवैसींनी राज्यातील राजकारणावर भूमिका स्पष्ट केली.

मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यावरून ओवैसींनी भाजपावर निशाणा साधला. “जर मी म्हटलो की देशाच्या पंतप्रधानांच्या घरासमोर कुराणचं वाचन करेन, तर तुम्ही काय म्हणाल? तुम्ही रॅपिड अॅक्शन फोर्स, सीआरपीएफला बोलवून गोळ्या घालाल. ती योग्य बाब नाही”, असं ओवैसी म्हणाले.

“संभाजीराजे वडिलांशी भांडून..”, राज ठाकरेंचा जुना व्हिडीओ ट्वीट करत राष्ट्रवादीचा निशाणा; म्हणे, “त्यांनी आता नाक रगडून…!”

“तुम्ही माझ्या घरासमोर का पठण करणार?”

“माझे ना राणा दाम्पत्याशी राजकीय संबंध आहेत ना उद्धव ठाकरेंशी राजकीय संबंध आहेत. पण जर प्रत्येकजण म्हणाले की घरासमोर पठण करणार तर कसं चालेल? माझ्या घरासमोर का पठण करणार तुम्ही? मुंबई उच्च न्यायालयाने देखील टिप्पणी केली आहे की तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात. तुमच्यावर देखील जबाबदारी आहे. आंदोलन करा, तुम्हाला कोण थांबवतंय? पण उद्या जर आम्ही घोषणा केली की भाजपाच्या सर्व नेत्यांच्या घरासमोर आम्ही कुराणचं पठण करणार तर ते योग्य ठरणार नाही”, असं ओवैसी यावेळी म्हणाले.

“तुम्ही परवानगी दिली, तुम्हीच सुरक्षा द्या”

दरम्यान, राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला पोलिसांनी परवानगी दिली असेल, तर पोलिसांनीच कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी घ्यायला हवी, असं ओवैसी म्हणाले.

Story img Loader