पंढरीवारीच्या पालखी सोहळ्यात आज मंगळवार सकाळपासून पावसाने उपस्थिती लावली आहे. वरून वरूणराजा बरसतोय तर संतमंडळी माऊलींच्या नामघोषात दंग होऊन पंढरीच्या दिशेन मार्गक्रमणा करत आहेत. सकाळी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा प्रवास सुरू झाला. पाऊले चालती पंढरीची वाट म्हणत मुसळधार पावसातही वारकऱ्यांची पावले थांबत नव्हती. त्याउलट पावसाच्या सोबत उत्साहाने माऊलींच्या नामाचा जयघोष करत वारकरी विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने पाऊल पुढे टाकत आहेत. दरम्यान, वारीच्या वाटेवर आणखी एक देखणे रिंगण पहावयास मिळाले. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण ठाकूर बुवांची समाधी येथे झाले. पाऊसामुळे झालेला चिखल, त्यात सरकणारे पाय या कशाचीही पर्वा न करता वारकऱ्यांनी रिंगण सोहळा उत्साहात संपुर्णत्वास आला.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा