Ashatai Pawar : शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही काका पुतण्यांमध्ये फूट पडली आहे हे महाराष्ट्राला जुलै २०२३ पासून माहीत आहेच. बारामती या मतदारसंघातून दोघंही नेतृत्व करतात. लोकसभा निवडणुकीत बारामतीतून सुप्रिया सुळे निवडून आल्या आणि खासदार झाल्या. तर विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे युगेंद्र पवारांच्या विरोधात निवडून आले आणि आमदार तसंच उपमुख्यमंत्री झाले. पवार विरुद्ध पवार असा सामना दोन्ही निवडणुकांमध्ये दिसला. आता नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी विठूरायाला दोन्ही पवार एकत्र येऊ दे असं साकडं घातलं आहे.

मे २०२३ मध्ये आणि जुलै २०२३ मध्ये काय घडलं?

मे २०२३ च्या पहिल्या आठवड्यात शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शरद पवारांनी मी राजकारणात सक्रिय असेन पण राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडतो आहे असं जाहीर केलं. त्या कार्यक्रमात अजित पवार यांचा आक्रमकपणा सगळ्यांनाच दिसून आला. पुढचे अध्यक्ष अजित पवार होतील असं वाटलं होतं. पण तसं घडलं नाही. सुप्रिया सुळेंकडे राष्ट्रीय पातळीवरची सूत्रं दिली गेली. अजित पवारांनाही हे अनपेक्षित होतं. अर्थात ही नाराजी म्हणजे हिमनगाचं टोक होतं याचा प्रत्यय जुलै २०२३ मध्येच आला. कारण जुलै २०२३ च्या पहिल्याच रविवारी अजित पवारांनी ४१ आमदारांसह महायुतीत प्रवेश करुन आपले राजकीय गुरु आणि काका शरद पवार यांनाच मोठा धक्का दिला.

Koregaon Bhima Shaurya Din
Koregaon Bhima Shaurya Din: महार रेजिमेंट आणि कोरेगाव विजय स्तंभ नेमके नाते काय? महार रेजिमेंटची स्थापना कशी झाली?
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray over the project Print politics news
मोठ्या प्रकल्पातील गतिरोधक दूर केले; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
CJI Chandrachud
CJI Chandrachud : “सरकारविरोधात निकाल देणं म्हणजे…”, न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याविषयी सरन्यायाधीशांचं परखड मत
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan?
Poonam Mahajan : “आजही आठवतं, वडिलांचं रक्त माझ्या हातांना लागलं होतं…”, पूनम महाजन प्रमोद महाजनांच्या आठवणींत भावूक
sharad pawar retirement (1)
Video: शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, आता राज्यसभेतही जाणार नाही? भाषणात म्हणाले…
What Raj Thackeray Said About Sharad Pawar
Raj Thackeray : “आमच्याकडे शरद पवार नावाचे संत जन्माला आले त्यांनी जातीपातींमध्ये..”, राज ठाकरेंची बोचरी टीका
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”

हे पण वाचा- Happy New Year 2025 : “महाराष्ट्र आता थांबणार नाही…”, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे अन् अजित पवारांनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

५ जुलै २०२३ च्या भाषणात खदखद समोर

५ जुलै २०२३ ला अजित पवार यांनी जे भाषण केलं त्यात त्यांनी मनातली सगळी खदखद बोलून दाखवली. तसंच आपल्यालाला कायमच कसं व्हिलन ठरवलं गेलं? हे देखील अजित पवारांनी सांगितलं. ज्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्यातला संघर्ष उभ्या महाराष्ट्रासमोर आला. यावेळी त्यांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करत त्यांनी आता पक्षाची धुरा सक्षम खांद्यावर देऊन मार्गदर्शकाच्या भूमिकेत असायला हवं होतं अशीही अपेक्षा बोलून दाखवली. मात्र शरद पवारांकडूनही अजित पवारांना उत्तर देण्यात आलं. यामुळे हा संघर्ष टोकाला गेला.

बारामतीकरांचा कौल लोकसभेत सुप्रिया सुळेंना, विधानसभेत अजित पवारांना

२०२३ प्रमाणेच २०१९ मध्येही असंच बंड अजित पवारांनी केलं होतं. पण ते मोडण्यात शरद पवार यशस्वी झाले होते. अर्थात पहाटेच्या शपथविधीचे सगळे पदर नंतर उलगडले. जे घडलं त्याची सगळी माहिती शरद पवारांना होती. २०२३ मध्ये मात्र असं झालं नाही. ४१ आमदारांसह अजित पवार महायुतीसह गेले. त्यामुळे शरद पवारांनी नव्याने मोर्चेबांधणी सुरु केली. नव्या नावासह आणि पक्षचिन्हासह लोकसभा निवडणुकीसाठी सुप्रिया सुळेंना ताकद दिली आणि त्यांचा विजय खेचून आणला. विधानसभेत मात्र याच्या विरुद्ध चित्र दिसलं. विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मैदान मारलं. ज्यानंतर दोन्ही पवार एकत्र येतील असं वक्तव्य आशाताई पवार यांनी केलं आहे.

काय म्हणाल्या आशाताई पवार?

हे वर्ष सगळ्यांना उत्तम आणि चांगलं जाऊदेत असं साकडं पांडुरंगाला मी घातलं आहे. शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येऊदेत असंही सांगितलं आहे. मला वाटतं की वर्षभरात हे दोघं एकत्र येतील. सगळ्यांना हे वर्ष सुखाचं, समाधानाचं जाऊदेत असंही साकडं मी घातलं आहे असंही आशाताई पवार यांनी म्हटलं. शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत म्हणून मी प्रार्थना केली. पांडुरंग माझं ऐकणार असा विश्वास वाटतो असंही आशाताई पवार म्हणाल्या. आशाताई पवार यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Story img Loader