शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थिकलशाचे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात देवगड तालुक्यातील कुणकेश्वर आणि सावंतवाडी तालुक्यातील आंबोली हिरण्यकेशी या ठिकाणी विसर्जन करण्यात आले.सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात शिवसेनेचे दोन जिल्हाप्रमुख आहेत. शिवसेनाप्रमुखांचे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ावर मोठे प्रेम होते. या जिल्ह्य़ातील सुपुत्राला मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, खासदार, आमदार, मुंबई महापौर अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनीच विराजमान केले होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थिकलश सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात २१ नोव्हेंबर रोजी आणण्यात आला होता. त्याचे आज विसर्जन करण्यात आले.
प्रत्येक तालुकास्तरावर व मार्गावरील गावागावांत या अस्थिकलशाचे ग्रामस्थांनी दर्शन घेतले. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर आणि सावंतवाडी तालुक्यातील आंबोली हिरण्यकेशी ही दोन्ही स्थळे शिवशंकराची तीर्थक्षेत्रे म्हणून प्रसिद्ध आहेत. या तीर्थक्षेत्री अस्थी विसर्जित करण्यात आल्या.
कुणकेश्वरला समुद्रात, तर हिरण्यकेशी नदीत अस्थींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. या वेळी शिवसैनिकांची मोठी उपस्थिती होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा