आशिष देशमुख यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत देशमुखांनी वक्तव्य केले होते. त्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शिस्तपालन समितीची बैठक पार पडली. यानंतर आशिष देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजावत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईनंतर आशिष देशमुख यांनी नाना पटोले यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “नाना पटोलेंनी न विचारता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले. म्हणून नाना पटोलेंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यायला पाहिजे होती,” असे आशिष देशमुखांनी म्हटलं आहे.

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका
guruji Nitesh Karale concern over giving opportunity to mp Kale wife Mayura Kale in Maharashtra
Video : कराळे गुरूजींची स्वपक्षीय खासदाराबद्दल ‘खदखद’,काय म्हणाले  ?
Supriya Sule asked why the investigative agencies are misusing power
सत्तेचा गैरवापर करून तपास यंत्रणांचा ससेमिरा कशासाठी; सुळे यांचा सवाल
Bhosari assembly, politics, ajit Gavan, Mahesh Landge
भोसरी राजकारण तापलं; महेश लांडगेंच्या तंबीला अजित गव्हाणेंचे प्रत्युत्तर, म्हणाले “पराभवाच्या छायेतून…”
supriya sule on devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीसांविरोधात आता खटला भरला पाहिजे, त्यांनी राज्यातील…”; छगन भुजबळांच्या ‘त्या’ दाव्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल!
maharashtra assembly poll 2024 rajendra raut and dilip sopal supporters clash barshi assembly elections
बार्शीत राजेंद्र राऊत – सोपल गटात गोंधळ; दोन्ही गटांचे आरोप-प्रत्यारोप, तणाव

हेही वाचा : अजित पवार आमदारांसह नॉटरिचेबल? शरद पवारांनी दिले स्पष्टीकरण; म्हणाले…

“मी सातत्याने काँग्रेस पक्षाच्या हिताचीच भूमिका घेतली आहे. ओबीसी समाज, राहुल गांधी आणि काँग्रेसच्या हिताची गोष्ट कोण करत असेल, तर त्याला नोटीस देणे चुकीचे आहे. बजावण्यात आलेल्या नोटीसीला वेळेपूर्वीच शिस्तपालन समितीला उत्तर पाठवण्यात येईल,” असे आशिष देशमुखांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : “रावणराज्य चालवणारे अयोध्येला चालले”, आदित्य ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर; म्हणाले…

“काँग्रेस पक्षात षड्यंत्र चालू आहे. ज्याची सुरूवात विधानसभेचे अध्यक्ष असताना नाना पटोले यांनी केली. नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता, तेव्हाच संशयाची सुई त्यांच्यावर गेली होती. तेव्हापासून षड्यंत्र सुरु आहे. हे देखील माझ्या उत्तरात दाखल करणार आहे,” असे आशिष देशमुख म्हणाले.