आशिष देशमुख यांनी आधी काँग्रेसमधून भाजपात, नंतर भाजपातून काँग्रेसमध्ये आणि आता पुन्हा काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला आहे. इतकंच नाही तर या पक्षांतरानंतर त्यांनी त्या-त्यावेळी आधीच्या पक्षातील नेत्यांवर सडकून टीकाही केली. भाजपातून काँग्रेसमध्ये आल्यावर तर त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातच निवडणूक लढवली. रविवारी (१८ जून) याच देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केल्यावर आशिष देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना २०१९ मधील त्या प्रसंगाला उजाळा दिला.

आशिष देशमुख म्हणाले, “विरोधी पक्षनेते अजित पवारांनी खोट्या जाहिरातींवर आपली मुलाखत दिली. त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं तोंड भरून कौतुक केलं. विरोधी पक्षनेते असून जे खरं आहे ते बोलण्याचं धाडस अजित पवारांनी केलं. त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो. त्याआधी जे विरोधी पक्षनेते होते ते आज फडणवीसांच्या नेतृत्वात सरकारमध्ये महसूलमंत्री म्हणून काम करत आहेत.”

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

“मी २०१९ मध्ये फडणवीसांविरोधात निवडणूक लढलो”

“त्याआधीचे विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे ते आज देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. मी जाणीवपूर्वक शब्द वापरला आहे. फडणवीसांचं नेतृत्व सर्वमान्य आहे. मी २०१९ मध्ये त्यांच्याविरोधात दक्षिण पश्चिम मतदारसंघात निवडणूक लढलो, मी विरोधक होतो. मात्र, आज मीही त्यांच्याबरोबर आलो आहे. त्याचा मला मनस्वी आनंद आहे,” असं मत आशिष देशमुख यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : फडणवीस-बावनकुळेंच्या उपस्थितीत आशिष देशमुख यांचा भाजपात प्रवेश

“फडणवीसांच्या नेतृत्वात मी भाजपात प्रवेश घेतो आहे”

“देवेंद्र फडणवीस अतिशय प्रतिभावंत आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी झपाटलेला हा आमचा नेता आहे. विदर्भाच्या विकासासाठी आमुलाग्र बदल करणारे ते नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आज मी भाजपात प्रवेश घेतो आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखा अविरत काम करणारा नेता आहे. आपण त्यांना उर्जावान उर्जामंत्री व पालकमंत्री म्हणून पाहिलं आहे,” असंही आशिष देशमुख यांनी नमूद केलं.

Story img Loader