आज महाराष्ट्राच्या तमाम जनतेला उद्देशून आदित्य ठाकरेंनी एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी भाजपावर आणि एकनाथ शिंदे सरकारवर कडाडून टीका केली आहे. तसंच तुमचं मत योग्य प्रकारे द्या. हुकूमशाहीशी लढा द्या असा मजकूर लिहित आवाहन केलं आहे. या पत्राला आता भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी पत्र लिहून उत्तर दिलं आहे. तसंच युवराज (आदित्य ठाकरे) म्हणजे तळ्याकाठी खोटे ध्यान लावून बसणाऱ्या ढोंगी बगळ्यांचे म्होरके आहेत असंही म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे आशिष शेलार यांनी?

प्रिय महाराष्ट्रवासीयांनो,

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Mother strangled her child shocking video viral on social media
आई की वैरीण? चिमुकल्या मुलाला जमिनीवर झोपवलं, गळा आवळला अन्… VIDEO पाहून होईल काळजाचं पाणी पाणी
Ratnagiri assembly defeat , Shivsena Thackeray Ratnagiri , Ratnagiri latest news, Ratnagiri shivsena news,
रत्नागिरी विधानसभेचा पराभवाचा वाद देवाच्या दारात, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गद्दारांना शिक्षा देण्यासाठी घातले गाऱ्हाणे
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : “आम्हाला ‘बटेंगे तो कटेंगे’ सांगणारे अशावेळी जातात कुठे?” बेळगावच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचा भाजपाला सवाल
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

तुम्हाला एका युवराजांचं पत्र आज मिळालं असेल, ते वाचून आमच्या मुंबईकरांना तर हसावे की रडावे असे झाले असेल. ज्यांना आपला इतिहास माहिती नाही किंवा सोयीस्कर विसरले असतील किंवा श्रीमान संजय राऊत यांनी सांगितलेलाच इतिहास, भूगोल माहिती आहे अशा युवराजांनी भविष्य, भूतकाळ आणि वर्तमानाबाबत वैचारिक तारे तोडले आहेत. कुमार वयात केलेले हे भाष्य समजून तुम्ही हे सगळं सोडून द्या.

नया है वह

कागदावर आरेचे जंगल घोषित करणारे, आपल्या अहंकारासाठी आरेतील मेट्रो कारशेड अडवून ठेवणारे, मुंबईतील कचरा, सांडपाणी यांची विल्हेवाट न लावणारे, प्रदुषणकारी प्रकल्पांचा दंड माफ करणारे हेच तथाकथित पर्यावरण प्रेमी आणि तत्कालीन पर्यावरण मंत्री युवराज मुंबईला दूषित करण्यास जबाबदार आहेत. आज बघा कसे तत्त्वज्ञान झाडत आहेत.

कटकमिशनसाठी प्रीमियम माफ

कटकमिशनसाठी मुंबईतील बिल्डरांना १२ हजार कोटींचा प्रीमियम माफ यांनी केला. मुंबईत एकाच वेळी बांधकामं सुरु झाली आणि धुळीमुळे मुंबईकरांचा श्वास आजही गुदमरतोय त्याला हेच युवराज जबाबदार आहेत.. आणि हेच आज प्रदुषणाच्या नावाने उलट्या बोंबा मारत आहेत.

माजी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र मगरीचे अश्रू ढाळत आहेत

हे आज महाराष्ट्राच्या प्रश्नांवर, शेतकऱ्यांविषयी बोलत आहेत. तुम्हाला आठवत असेलच… बांधावर जाऊन मदत करणार, कर्जमाफी देणार अशा घोषणा दिल्या आणि अडीच वर्षे घरात बसून राहिले. यांच्या अपयशाची यादी किती मोठी आहे, अडीच वर्षात मराठा, ओबीसी आरक्षण घालवले, महाराष्ट्राचे प्रकल्प रोखले. महाराष्ट्रात प्रकल्प आला की विरोध करणारे, कटकमिशनच्या नादात मुंबई महापालिका लुटणारे, मराठी माणसांच्या घरांमध्येही कमिशन खाणारे. करोना काळात मयताच्या बॉडी बॅगमध्ये कमशिन खाणारे, रुग्णांच्या औषध, कामगारांच्या खिचडीत कटकमिशन कमवणारे.. अडीच वर्षांत मंत्रालयातही न जाणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आज मगरीचे अश्रू ढाळत आहेत. म्हणून महाराष्ट्रातील तमाम जनतेला आमचे आवाहन.

आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राला यांनी मागे नेऊन दाखवलं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वातील सरकार आज महाराष्ट्राला पुन्हा वेगाने पुढे घेऊन जाण्याचे काम करते आहे. मेट्रो, कोस्टल रोड, शिवडी न्हावा शेवा, नवी मुंबई विमानतळासह राज्यात अनेक विकासकामे सुरु झाली आहेत. पारदर्शक कारभार असलेले सरकार आले, विकासकामे सुरु झाली. राज्यात प्रकल्प येऊ लागले. परदेशी गुंतवणूक होऊ लागली. पुन्हा महाराष्ट्र वेगवान झाला असताना या कामांमध्ये गतिरोधक म्हणून उबाठा काम करत आहे.

सावधान!

युवराज म्हणजे तळ्याकाठी खोटे ध्यान लावून बसणाऱ्या बगळ्यांच्या टोळीचे म्होरके आहेत. यांच्या बोलण्यात, वागण्यात कशातच राम उरलेला नाही. जय श्रीराम

आपला
आशिष शेलार

असं म्हणत आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंच्या पत्रावर खरमरीत उत्तर दिलं आहे.

Story img Loader