संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणानंतर ही निवडणूक अधिकच चर्चेत आली होती. कारण, या हल्ल्याप्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले असून जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेला आहे. शिवाय, या घटनेनंतर भाजपा आणि शिवसेना यांच्यात या प्रकरणावरुन जोरदार वाद सुरू देखील आहे. अखेर आज निकालानंतर भाजपाने या निवडणुकीत आघाडी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपाच्या सिद्धिविनायक सहकार पॅनलने ११ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान आणि विधान परिषदेत एक जागा गमवल्यान्…आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो…” अशाप्रकारे मालवणी भाषेत ट्विट करत शेलार यांनी ट्विट करत टोला लगावला आहे.

तर, “नवी मुंबई, ठाणे, मुंबई महापालिका निवडणुकींच्या निकालाची ही नांदी आहे. अमित शाह म्हणाले त्याप्रमाणे हिंमत असेल तर तिघेही एकत्र समोर लढाईला या आम्ही तयार आहोत!” असं महाविकास आघाडीला खुलं आव्हान देखील शेलार यांनी दिलेलं आहे.

सिंधुदुर्गात महाविकास आघाडीला मोठा धक्का; जिल्हा बँक निवडणुकीत नारायण राणेंच्या पॅनलचे वर्चस्व

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह एकूण १४ विद्यमान संचालक निवडणूक रिंगणात उभे होते. शिवसेना-राष्ट्रवादी, काँग्रेस या महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनेल विरुद्ध भाजपाचे सिद्धिविनायक सहकार पॅनेल यांच्यात चुरशीची लढत झाली.