शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत सातत्याने भारतीय जनता पार्टीवर टीका करत आहेत. या टीकेला भाजपाचे वेगवेगळे नेते प्रत्युत्तर देत असतात. संजय राऊतांच्या दररोज सकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदांवर भाजपाकडून टीका होत असते. या टीकेला उत्तर देताना शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषदेत संजय राऊत भाजपा नेत्यांना म्हणाले, “तुम्ही कारस्थानं बंद करा, आम्ही बोलणं बंद करू. माझ्याऐवजी तुम्ही सकाळी ९.३० वाजता बोला”. दरम्यान, संजय राऊत यांनी मी पत्रकारांशी बोलल्यामुळे तुमच्या पोटात का दुखतं असा सवालही केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, संजय राऊतांच्या आव्हानाला भाजपा नेते आशिष शेलार यांनी उत्तर दिलं आहे. आशिष शेलार म्हणाले की, “रात्री ९.३० वाजता लोक टीव्ही सुरू करतात आणि सीरियल पाहतात. सकाळी ९.३० वाजता लोक टीव्ही बंद करतात कारण सीरियल किलर वेड्यासारखा बडबडत असतो ते त्याला बघतात.” दरम्यान, संजय राऊतांच्या लोकशाही धोक्यात आहे या वक्तव्याला देखील शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं. शेलार म्हणाले की, “लोकशाही धोक्यात आहे, असं संजय राऊतांनी बोलूच नये. कारण लोकशाहीमुळे आणि या देशातल्या संविधानामुळे ते जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत.”

हे ही वाचा >> राहुल गांधी ‘मातोश्री’वर जाणार? वीर सावरकर वादानंतर आता काँग्रेसचं डॅमेज कंट्रोल?

देवेंद्र फडणवीसांची राऊत आणि मविआवर टीका

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीदेखील संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेवर आणि महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ ही तडा गेलेली आहे. महाविकास आघाडीची तीन तोंडं तीन वेगळ्या दिशांना असतात. त्यांचा एक भोंगा सकाळी ९ वाजता वाजतो, दुसरा भोंगा त्याच्या विरुद्ध दुपारी १२ वाजता वाजतो, तर तिसरा भोंगा संध्याकाळी वेगळेच काहीतरी बोलतो. त्यामुळे हे लोक राज्यातील जनतेसाठी काहीही करू शकत नाहीत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashish shelar says people turn off tv after seeing serial killer sanjay raut asc
Show comments