Ashish Shelar on Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या अंधेरी येथील क्रीडा संकुलात गुरुवारी (२३ जानेवारी) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री व भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले, “विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मी पहिल्यांदाच तुमच्यासमोर येत आहे. तो निकाल मला पटलेला नाही. त्यानंतर मधल्या काळात अब्दाली येऊन गेले, कोण ते तुम्हाला माहीत आहे. अमित शाह. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातला विजय उद्धव ठाकरेंना जागा दाखवणारा आहे. जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय असतो ते तुम्हाला भविष्यात दिसेल”. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेला आता भाजपा नेते प्रत्युत्तर देऊ लागले आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री व मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना म्हटलं आहे की “तुमचा जन्म व राजकीय कारकीर्द सुरू होण्याआगोदरच्या घटनांवर बोलण्याचं काहीच कारण नाही”.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा