शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी हिंगोली येथील ‘निर्धार सभे’तून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. जपान दौरा, राज्यातील दुष्काळाची परिस्थिती आणि महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जाण्यावरून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिरकस टोलेबाजी केली. राज्यात दुष्काळ पडला असताना देवेंद्र फडणवीस जपानला गेले. टरबुजाच्या झाडालाही पाण्याची आवश्यकता असते, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या टीकेला भाजपा नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले, उद्धव ठाकरे यांची सभा म्हणजे, पूर्वीच्या काळी एखाद्या गावात दुःख, मृत्यू किंवा अप्रसंग घडल्यावर त्या गावातल्या काही महिला एकत्र येऊन रडण्याचा कार्यक्रम करायच्या. त्या कार्यक्रमाला रुदाली म्हटलं जायचं. तो कार्यक्रम म्हणजे उद्धव ठाकरेंची सभा. ते रडके गावकरी म्हणजे उद्धव ठाकरेंची सभा. पूर्वी गावात सार्वजनिक रडण्याचा कार्यक्रम करणाऱ्या व्यावसायिक महिलांचा जो कार्यक्रम असायचा तो म्हणजे उद्धव ठाकरेंचं भाषण.

jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
Uddhav Thackeray On Raj Thackeray :
Uddhav Thackeray : “पक्षाला एक हेतू लागतो, पण हे त्या पक्षात…”, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
Ramdas Athawale On Raj Thackeray
Ramdas Athawale : “मी असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?”, रामदास आठवलेंचं मोठं विधान
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मी होतो तरीही…”
Samajwadi Party objects to Thackeray groups Hindutva stance print politics news
ठाकरे गटाच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर ‘सपा’चा आक्षेप

आशिष शेलार म्हणाले, ज्यांना स्वतःचे विचार नाहीत, स्वतःच्या पक्षाचा कार्यक्रम नाही, पक्षाची धोरणं नाहीत. केवळ दुसऱ्याच्या घरात डोकावणं, इतरांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देणं, थयथयाट करणं असंच त्यांच्या सभेत सुरू असतं. त्यामुळे स्वतःचा कार्यक्रम, कुठलंही धोरण नसलेला पक्ष म्हणजे उद्धव ठाकरेंचा पक्ष. उद्धव ठाकरे यांना आमचं सांगणं आहे की त्यांनी मर्यादा पाळावी, मर्यादा ठेवावी आणि मर्यादेत राहावं. भाजपाचा प्रामाणिकपणा हा आमचा दुबळेपणा नव्हे. तुमची (उद्धव ठाकरे) अवस्था ‘शोले’ या चित्रपटातील ‘आसरानी’सारखी (१९७५ साली प्रदर्शित झालेल्या रमेश सिप्पी दिग्दर्शित शोले या हिंदी चित्रपटात अभिनेते आसरानी यांनी एका जेलरची विनोदी भूमिका साकारली होती.) झाली आहे, आधे उधर, आधे इधर और मैं कडक जेलर.

उद्धव ठाकरेंच्या देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे हे एकदम बावचळलेल्या आणि उध्वस्त मनःस्थितीत आहेत. त्यामुळेच ते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलत असतात. मी यापूर्वीही सांगितलं आहे, अशाने एखाद्या वेळी मोठा उद्रेक होईल, त्याचे पडसाद मुंबईत उमटतील. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि आम्ही ते सगळं रोखू शकणार नाही.

Story img Loader