देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेले कलंक आहेत, अशी बोचरी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (१० जुलै) अमरावती येथे पार पडलेल्या सभेत केली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी वापरलेल्या कलंक या शब्दावरून राज्यात आता घमासान सुरू झालं असून भाजपातील अनेक नेते आता उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनीही टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> “मी जे म्हटलं ते योग्यच! हे कलंकितच लोक, कारण…”; उद्धव ठाकरेंची पुन्हा भाजपावर जोरदार टीका

“उध्दवजी, जे दुसऱ्यांसाठी जगतात ते कलंक कसे ठरतील? कलंक तर ते असतात जे नाल्यातील गाळ खातात, कोविडमध्ये सुध्दा भ्रष्टाचार करतात, गरिबांच्या पोरांच्या दप्तर, पाटी पेन्सिल मध्ये पण कट कमिशन खातात, जे रस्त्यावरचे डांबर खातात, जे “मी आणि माझं कुटुंब” एवढंच जगतात, थोडक्यात काय तर.. जे मुंबईकरांना लुटतात तेच कलंक ठरतात!”, असं ट्वीट आशिष शेलार यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

“देवेंद्र फडणवीस हे नागपुराला लागलेले कलंक आहेत. आता सांगत आहेत, उद्धव ठाकरेंनी पाठित खंजीर खुपसला म्हणून आम्ही यांच्याबरोबर गेलो. पहिलं उद्धव ठाकरेच्या पाठित खंजीर कुणी खुपसला? २०१४ ते २०१९ तुमच्याबरोबर सत्तेत होतो. २०१४ साली शिवसेनेनं नाहीतर, तुम्ही युती तोडली. तेव्हा मी काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. मी तिथेच होतो आणि तिथेच आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे,” असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केला आहे.

हेही वाचा >> VIDEO : उद्धव ठाकरेंनी सभागृहात थेट देवेंद्र फडणवीसांची ‘ती’ ऑडिओ क्लिपच ऐकवली; म्हणाले, “नागपूरला लागलेले…”

तर तुम्ही जबाबदार असाल

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ते म्हणाले, “तुमचं संतुलन बिघडलं असेल तर मनोरुग्णालयात जा, नागपुरात मनोरुग्णालय आहे तिथे जाऊन उपचार घ्या. तुम्ही बावचळले असाल तर डॉक्टर बदला. परंतु, यापुढे जर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोललात तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आत्ता रस्त्यावर आंदोलन केलंय, पुढचं आंदोलन तुम्हाला माहिती नाही कुठं होईल. आमचे लोक तुमच्या गाड्या अवडल्याशिवाय राहणार नाहीत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला तुम्ही जबाबदार असाल.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashish shelar targeted to uddhav thackeray over kalank case sgk
Show comments