राज्यात बियाणांच्या व खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा प्रश्न आज (१९ जुलै) सभागृहात विरोधी पक्षांनी मांडला. यावर, नवनियुक्त कृषीमंत्री धनंजय मुंडे सदस्यांच्या प्रश्नाचं समाधान करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, कृषीमंत्री उत्तर देत असताना विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. यावरून भाजपा आमदार आशिष शेलार यांनी विरोधी पक्षनेतेपदावरून विरोधकांना शाब्दिक चपराक लगावली आहे.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या आधीच राज्याच्या विरोधी बाकावर बसणारे अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते पद आता कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. अधिवेशनाच्या आधीच यावर निर्णय होणे अपेक्षित असताना महाविकास आघाडीने अद्यापही याबाबत निर्णय घेतला नाही. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाचे पहिले तीन दिवस विरोधी पक्षनेत्याशिवाय गेले आहेत. परंतु, सभागृहात विरोधी पक्षनेता नसला तरीही काँग्रेसच्या अनेक आमदारांनी आज सभागृह दणाणून सोडले.

Aditi Tatkare
मविआतील बंडखोरी आदिती तटकरेंच्या पथ्यावर ?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Ajit Pawar Bhor Assembly Constituency
Ajit Pawar: ‘नायतर आम्हाला कुत्रं विचारणार नाही’, भरसभेतच अजित पवार भडकले, पोलिसांवर व्यक्त केला संताप
Katol, Saoner, salil Deshmukh, Ashish deshmukh,
विरोधकांचे दोन मतदारसंघ भाजपच्या निशाण्यावर; काटोल, सावनेरची लढत प्रतिष्ठेची
Latur Politics
Latur Politics : अमित देशमुखांना भाजपाच्या अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान; देशमुख वर्चस्व राखणार की चाकूरकर जायंट किलर ठरणार?
maharashtra assembly election 2024 mim imtiaz ialil vs bjp atul save aurangabad east assembly constituency
लक्षवेधी लढत : एक है तो सेफ है’ विरोधात ‘इत्तेहाद’!
rebellion of jayashree patil three way contest in the sangli assembly constituency
सांगलीत दादा घराण्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न

आजच्या कामकाजाला सुरुवात होताच पहिल्याच तासांत सभागृहात खतांच्या किमती आणि बोगस बियाणांचा मुद्दा गाजला. बोगस बियाणं आणि खतांच्या भाववाढीवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात तुफान खडाजंगी झाली. कृषीमंत्री धनजंय मुंडे बोलत असतानाच विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, नाना पटोले प्रतिप्रश्न उपस्थित करत होते. या मुद्द्यांवरून बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले सभागृहात आक्रमक झाले होते. तसंच, बोगस बियाणांसंदर्भात संबंधितांवर कारवाई कधी करणार? असा प्रश्नही विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत होता.

“खतांचे भाव वाढलेले नाहीत, स्थिर आहेत”, असं धनजंय मुंडे म्हणाले. त्यामुळे सभागृहात गदारोळ झाला. तर, बोगस बियाणांसदर्भात याच अधिवेशनात कायदा आणणार असल्याची ग्वाहीही धनंजय मुंडे यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणावरून विरोधकांनी गोंधळ घातल्याने अध्यक्षांनी संरक्षण द्यावं अशी मागणीही धनजंय मुंडे यांनी केली. या सर्व प्ररकणावर चर्चा सुरू असतानाच भाजपा नेते आशिष शेलार यांनी या चर्चेत सहभाग घेत विरोधकांवर टीका केली.

“राज्यातील बियाणे, खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, हा प्रश्न होता. यासदर्भात मंत्री उत्तर देत होते. परंतु, वरिष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, अशोक चव्हाण हे सर्व मध्येच उठून प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न आधी निपटवा. मग सगळे शांत बसतील. प्रश्नाचं मंत्र्यांनी उत्तर दिलंय. विरोधी पक्षनेतेपद ठरवा, त्यासाठीच हे चालू आहे”, असा आरोप आशिष शेलार यांनी केला.

आशिष शेलारांनी मध्येच उठून वेगळा मुद्दा मांडल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही त्यांना समज दिली. याप्रश्नाची संबंधितच प्रश्न विचारा, असं आशिष शेलार म्हणाले.