जिल्ह्य़ातील अर्धापूर तालुक्यामधील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या गटाचा झेंडा पुन्हा फडकला.
कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षकि निवडणुकीत २० जागांसाठी २५ केंद्रांवर रविवारी मतदान घेण्यात आले. ९ हजार ७७८ पकी ७ हजार ७८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी सकाळी अर्धापूर येथे मतमोजणी सुरू झाली. सायंकाळपर्यंत ऊसउत्पादक गटातील सर्व १५ जागांवर चव्हाण गटाचे उमेदवार मोठय़ा फरकाने विजयी झाले. यात विद्यमान अध्यक्ष गणपतराव तिडके यांचा समावेश आहे. या सर्व उमेदवारांनी पावणेसहा हजारांहून अधिक मते घेत विरोधी गटाचे पानीपत केले.
विजयी उमेदवारांची नावे – गणपतराव तिडके, सुभाष कल्याणकर, प्रवीण सखाराम देशमुख, व्यंकटराव कल्याणकर, कैलाश दाड, शिवाजीराव पवार, रंगराव इंगोले, रामराव नारायणराव कदम, मोतीराम जगताप, किशनराव पाटील, बालाजी गोिवदराव िशदे, माधवराव व्यंकटराव िशदे, दत्तराम आवतिरक, अशोक कदम व भीमराव कल्याणे. महिला प्रतिनिधी व इतर प्रवर्गातील एकंदर पाच जागांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी या १५ जागांच्या निकालानंतर सुरू होती. तेथेही चव्हाण गटाचे उमेदवार आघाडीवर होते. आमदार अमिता चव्हाण पूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा