Maharashtra Former CM Ashok Chavan Resigned from Congress : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. पक्षांतर्गत वाद मला चव्हाट्यावर आणायचे नाहीत, असं सांगून त्यांनी राजीनामा देण्यामागची भूमिका स्पष्ट करणं टाळलं असलं तरीही त्यांना भाजपाकडून ऑफर असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. दरम्यान, अशोक चव्हाणांचा राजीनामा काँग्रेससाठी आणि पर्यायाने महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जातोय. काँग्रेसला बसलेल्या धक्क्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सूचक वक्तव्य केलंय. तसंच, याही परिस्थितीतून काँग्रेस पुन्हा उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमधील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या. परंतु, अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडण्यामागचं खरं कारण स्पष्ट केलं नाही. आज सुशीलकुमार शिंदे यांना अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याविषयी विचारलं असता ते म्हणाले, काँग्रेसवर ओढावलेली ही काय पहिलीच वेळ नाही. इंडिया शायनिंगच्या वेळीही मोठ्या संख्येने लोक काँग्रेसमधून गेले होते. पण जे राहिले ते जिद्दीने लढले आणि त्यावेळी आमचं सरकार आलं. त्यामुळे यावेळीही असंच काहीसं होईल, असा विश्वास सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा >> अस्लम शेख यांनीही राजीनामा दिला?, एक्सवर पोस्ट करत म्हणाले; “मी स्पष्ट करतो की…”

काय आहे नाना पटोलेंची प्रतिक्रिया?

“काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्दैवी आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचा विचार आणि लोकशाही वाचविण्यासाठी धर्मांध, हुकुमशाही वृत्तीच्या भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढून त्यांना पराभूत करू. असं म्हणत नाना पटोलेंनी या प्रकरणी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा >> Maharashtra News Live : “मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत…”, राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका

उद्धव ठाकरे म्हणाले, काही वेळापूर्वी एक बातमी आमच्या कानावर आली की, अशोक चव्हाण भाजपात गेले. आता मी बघणार आहे की, निवडणूक आयोग म्हणून दिल्लीत एक लबाड संस्था बसलीय, तिने शिवसेना चोराच्या हातात दिली. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी चोराच्या हातात दिली आहे. आता काँग्रेसही अशोक चव्हाणांच्या हातात देतात की काय ते आपण बघुया. कारण निवडणूक आयोग काहीही करू शकतो.

Story img Loader