राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. राष्ट्रवादीत त्यामुळे विविध चर्चा होताना दिसत आहेत. तसंच राष्ट्रवादीचा पुढचा बॉस कोण? यावरही बैठका घेतल्या जात आहेत, अंदाज वर्तवले जात आहेत. अशात महाविकास आघाडीचं काय होणार? असा प्रश्न विचारला जातो आहे. याच दरम्यान संजय राऊत विरूद्ध नाना पटोले असा सामना रंगला आहे. त्यात आता अशोक चव्हाण यांनीही संजय राऊत यांना खडे बोल सुनावले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात काय वाद झाला?

संजय राऊत यांनी आमच्या पक्षात चोंबडेपणा करु नये ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजपासोबत जाण्याची चूक करेल असं वाटत नाही. शरद पवार हे फुले, शाहू आंबेडकर यांचा विचार मानणारे आहेत. त्यामुळे ते भाजपासोबत जाणार नाहीत असा आमचा विश्वास आहे असं नाना पटोले यांनी म्हटलं तसंच संजय राऊत यांनी चोंबडेपणा करु नये. ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत असंही त्यांनी सुनावलं.

संजय राऊत यांनी नेमकं काय उत्तर दिलं?

यानंतर संजय राऊत यांनी नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलं. नाना पटोलेंना त्यांचा काँग्रेस पक्षच गांभीर्याने घेत नाही. नाना पटोलेंपेक्षा राहुल गांधी माझ्याशी जास्त बोलतात. यावर आता अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर देत संजय राऊत यांना सुनावलं आहे.

काय म्हणाले अशोक चव्हाण ?

तीन पक्षांची आघाडी असल्याने काहीवेळा शाब्दिक खटके उडतात. मात्र नाना पटोलेंना पक्ष गांभीर्याने घेत नाही असं म्हणता येणार नाही. नाना पटोले हे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तिन्ही पक्षांनी एकमेकांविषयी बोलताना काळजी घेतली पाहिजे. आम्ही टोकाला जाणार नाही अशा पद्धतीने वक्तव्यं केली पाहिजे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok chavan gave reply to sanajay raut about his statement about nana patole scj