राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेतली आहे. ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्ती प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवारांनी अचानक आपल्या निवृत्तीची घोषणा केली. शरद पवारांच्या या घोषणेनंतर कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते भावुक झाले आहेत. संबंधित निर्णय लगेच मागे घ्या, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

शरद पवारांनी अध्यक्षपदावरून निवृत्ती घेतल्याची घोषणा केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यानं असं अचानक निवृत्ती घेणं खटकणारी बाब आहे, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Sandeep Deshmukh Wardha district Ajit Pawar NCP group
वर्धा जिल्ह्यात सहकार गटात उभी फूट, एकाच घरी दोन झेंडे
Santosh Deshmukh family expresses expectations from Ajit Pawar for justice
“अजितदादांनी प्रथम न्याय देण्याचे कार्य करावे,” संतोष देशमुख कुटुंबीयांची अपेक्षा
Sunil Tatkare On Raigad Guardian Minister
Sunil Tatkare : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित केल्यानंतर सुनील तटकरेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “मुख्यमंत्री आल्यानंतर…”
Uday Samant on Vijay Wadettiwar
Uday Samant: “भाजपामध्ये येण्यासाठी तुम्ही फडणवीसांना…”, उदय सामंत यांचा विजय वडेट्टीवारांवर पलटवार, दिले होते राजकीय भूकंपाचे संकेत

यावेळी अशोक चव्हाण म्हणाले, “राष्ट्रवादीच्या भूमिकेवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. पण शरद पवारांसारख्या अनुभवी ज्येष्ठ नेत्याने अशाप्रकारे अचानक राजीनामा देणं, ही निश्चित खटकणारी बाब आहे. विशेषत: केंद्रीय पातळीवर सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन आगामी काळात भाजपाविरोधात आघाडी उभी करत असताना शरद पवारांची निवृत्ती घेणं, ही न पटणारी बाब आहे. त्यांनी असं करायला नको होतं, अशीच आमची भावना आहे. पण हा निर्णय त्यांचा अंतर्गत निर्णय असून काँग्रेस पक्ष त्यावर लक्ष ठेवून आहे.”

हेही वाचा- “तुम्ही थांबलात तर आम्हीही थांबू”, शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर जयंत पाटलांना अश्रू अनावर

शरद पवारांनी अध्यक्ष पदावरून घेतलेल्या निवृत्तीचा महाविकास आघाडीवर काही परिणाम होईल का? असं विचारलं असता अशोक चव्हाण म्हणाले, “त्याचा परिणाम महाविकास आघाडीवर होईल,असं मला वाटत नाही. शेवटी नेतृत्व बदलत राहतं. पण एक अनुभवी नेता, या प्रक्रियेतून बाहेर पडला तर निश्चित नुकसान होईल. म्हणून त्यांचं अध्यक्ष पदावर राहणं, गरजेच आहे, असं मला वाटतं. पण शेवटी याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने निर्णय घ्यायचा आहे.”

Story img Loader