गेल्या आठवडय़ात न्यायालयाने फटकारल्यानंतर काँग्रेस श्रेष्ठींकडून कोणताही दिलासा न मिळाल्याने अस्वस्थ झालेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड, लातूर व िहगोली या तीन लोकसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. सोमवारी (दि. २७) होणाऱ्या या मेळाव्यासंदर्भात पक्षपातळीवरून कोणत्याही सूचना नाहीत. िहगोलीची जागा सध्या राष्ट्रवादीकडे आहे.
‘आदर्श’ प्रकरणात राज्य सरकारने अहवाल फेटाळल्यानंतर अशोक चव्हाण यांना दिलासा मिळाला होता. पण, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अहवाल फेटाळल्याबाबत नापसंती व्यक्त केल्यानंतर राज्य सरकारने हा अहवाल पुन्हा अंशत स्वीकारला. राज्यपालांनी सीबीआयला दोषारोपपत्र दाखल करण्यास परवानगी नाकारल्यानंतर चव्हाण समर्थकांना दिलासा मिळाला असला, तरी न्यायालयाने या प्रकरणात कठोर भूमिका घेतल्याने त्यांचे अवसान गळाले होते.
देशात सध्या निवडणुकांचे वारे आहेत. मात्र, काँग्रेसकडून चव्हाण यांच्यावर कोणतीही जबाबदारी सोपविलेली नाही.
पक्षपातळीवर त्यांना अजूनही दिलासा मिळाला नाही. िहगोली, लातूर मतदारसंघांत नांदेडचा काही भाग आहे. पण िहगोली मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून मुंबई-दिल्लीतच तळ ठोकणारे चव्हाण गेल्या पाच-सहा दिवसांपासून नांदेडातच आहेत. वेगवेगळ्या विकासकामांचा शुभारंभ करताना त्यांनी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jan 2014 रोजी प्रकाशित
अशोक चव्हाण अस्तित्वासाठी सरसावले!
गेल्या आठवडय़ात न्यायालयाने फटकारल्यानंतर काँग्रेस श्रेष्ठींकडून कोणताही दिलासा न मिळाल्याने अस्वस्थ झालेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
First published on: 26-01-2014 at 04:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok chavan ready to reshape political career