माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी नुकताच काँग्रेसला रामराम करून भारतीय जनता पार्टी प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी भाजपाने त्यांना राज्यसभा उमेदवारीची भेट दिली आहे. अशोक चव्हाण यांनी गुरुवारी (१५ फेब्रुवारी) राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरला आहे. चव्हाण यांची राज्यात काम करण्याची इच्छा होती परंतु, भाजपाने त्यांना दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतला आरहे. अशोक चव्हाणांकडे मोठा राजकीय अनुभव आहे. तसेच त्यांची प्रशासनावर पकड आहे. त्यांच्यासारखा नेता भाजपाला दिल्लीत हवा होता. त्यामुळेच चव्हाण यांना भाजपाने राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जातं आहे. याबद्दल अशोक चव्हाण म्हणाले, मी आता वयाची साठी पार केली आहे. तसेच माझ्याकडे असलेला राजकीय अनुभव पाहता पक्षश्रेष्ठींना वाटलं असावं की, मी आता दिल्लीत काम करावं. त्यामुळेच त्यांनी मला राज्यसभेची उमेदवारी दिली असावी.

अशोक चव्हाण यांनी १२ फेब्रुवारीला काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा (विधानसभा सदस्यत्व) राजीनामा दिला. तर १३ फेब्रुवारीला त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाने १४ फेब्रुवारी रोजी त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आणि १५ फेब्रुवारीला त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, १४ फेब्रुवारीपर्यंत राज्याच्या राजकारणात आणि भाजपाच्या गोटात राज्यसभेसाठी नारायण राणे यांच्या नावाची जोरदार चर्चा चालू होती. राणे यांना भाजपा राज्यसभेची उमेदवारी देईल असं बोललं जात होतं. परंतु, भाजपाने महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, डॉ. अजित गोपछडे आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपाने नारायण राणेंऐवजी अशोक चव्हाणांची निवड का केली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
Sadabhau Khot On Maharashtra Cabinet Expansion
Sadabhau Khot : “मोठ्या पक्षांची मंत्रिपदे नंतर निश्चित करा, आधी…”, सदाभाऊ खोत यांनी महायुतीच्या नेत्यांकडे केली ‘ही’ मागणी
Ramdas Athawale On Raj Thackeray
Ramdas Athawale : “मी असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?”, रामदास आठवलेंचं मोठं विधान

नारायण राणे आणि अशोक चव्हाण यांच्यात अशीच एक घटना यापूर्वीदेखील घडली आहे. २००८ साली काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी नारायण राणे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. परंतु, अचानक अशोक चव्हाण यांचं नाव पुढे आलं आणि अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री झाले. आता पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे. राणे यांचं नाव राज्यसभेसाठी चर्चेत होतं. परंतु, अचानक अशोक चव्हाण भाजपात आले आणि त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली. अशोक चव्हाण यांच्यामुळे दोन वेळा नारायण राणे यांना राजकीय पदांनी हुलकावणी दिली आहे. यावर अशोक चव्हाण म्हणाले, कदाचित हा केवळ राजकीय योगायोग आहे. चव्हाण यांनी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत या घटनेवर सविस्तर भाष्य केलं.

हे ही वाचा >> “इथून पुढे धुवून काढेन”, नारायण राणेंच्या ‘त्या’ टीकेला मनोज जरांगेंचं उत्तर; निलेश राणेंना म्हणाले, “तुमच्या वडिलांना…”

अशोक चव्हाण म्हणाले, आमचे स्टार्स कुठेतरी मिसमॅच होतायत. हे असं का होतंय ते मला माहिती नाही. मी परवा भाजपात प्रवेश केल्यानंतर नारायण राणे यांनी फोन केला होता. खूप दिवसांनी त्यांनी मला फोन केला होता. पक्षात आल्याबद्दल त्यांनी माझं अभिनंदन केलं. परंतु, राज्यसभा उमेदवारीबद्दल मला काही सांगता येणार नाही. कारण तेव्हा मी भाजपात नव्हतो. माझं येणं आणि नारायण राणे यांचं जाणं याचा काही संबंध नाही. पक्ष नेतृत्वाने असा निर्णय का घेतला हे मला माहिती नाही. माझ्या उमेदवारीबद्दल ठरलं होतं असं मी म्हणणार नाही. परंतु त्यांना (भाजपाचं दिल्लीतलं नेतृत्व) जरुर वाटलं असेल की माझ्यासारखा अनुभवी नेता, ज्याने प्रशासनात काम केलं आहे, ज्याने राजकीय क्षेत्रात काम केलं आहे, त्याचा दिल्लीत अधिक उपयोग होऊ शकतो, असं त्यांना कदाचित वाटलं असेल. त्यामुळे तातडीने त्यांनी निर्णय घेऊन मला संधी दिली. हा त्यांचा मोठेपणा आहे.

Story img Loader