माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी नुकताच काँग्रेसला रामराम करून भारतीय जनता पार्टी प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी भाजपाने त्यांना राज्यसभा उमेदवारीची भेट दिली आहे. अशोक चव्हाण यांनी गुरुवारी (१५ फेब्रुवारी) राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरला आहे. चव्हाण यांची राज्यात काम करण्याची इच्छा होती परंतु, भाजपाने त्यांना दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतला आरहे. अशोक चव्हाणांकडे मोठा राजकीय अनुभव आहे. तसेच त्यांची प्रशासनावर पकड आहे. त्यांच्यासारखा नेता भाजपाला दिल्लीत हवा होता. त्यामुळेच चव्हाण यांना भाजपाने राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जातं आहे. याबद्दल अशोक चव्हाण म्हणाले, मी आता वयाची साठी पार केली आहे. तसेच माझ्याकडे असलेला राजकीय अनुभव पाहता पक्षश्रेष्ठींना वाटलं असावं की, मी आता दिल्लीत काम करावं. त्यामुळेच त्यांनी मला राज्यसभेची उमेदवारी दिली असावी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा