सातारा येथील नूतन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी पदाचा कार्यभार जिल्हाधिकारी डॉ.रामास्वामी यांच्याकडून स्वीकारला. या वेळी त्यांनी लोकाभिमुख प्रशासन करत असताना कायदेशीर, सनदशीर मार्गानेच कामकाज चालेल असे सांगितले. तर डॉ.रामास्वामी एन यांनी सातारकरांनी मला खूप सहकार्य केले त्यामुळे मी विकास कामे करू शकलो, असे सांगितले.
शनिवारी सकाळी मुद्गल यांनी जिल्हाधिकारी डॉ.रामास्वामी यांच्यासोबत कार्यालयात प्रवेश केला. त्यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे या सह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
मुद्गल यांना शुभेच्छा देऊन डॉ.रामास्वामी यांनी सातारा जिल्ह्यातील आपला तीन वर्षांचा कार्यकाळ हा आपल्या आयुष्यात संस्मरणीय राहील. तीन वर्षांतील दोन वष्रे ही दुष्काळाशी सामना करण्यात गेली. मात्र त्यातही पाण्याच्या नियोजनापासून तसेच पाणी साठवणुकीच्या विविध योजना मला या भागात करता आल्या. या साठी राजकारणी मंडळी, समाजसेवी संस्था,माझे सहकारी तसेच जनतेचे सहकार्य मला लाभले असे ते म्हणाले.
अश्विन मुद्गल नूतन जिल्हाधिकारी; कार्यभार स्वीकारला
सातारा येथील नूतन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी पदाचा कार्यभार जिल्हाधिकारी डॉ.रामास्वामी यांच्याकडून स्वीकारला. या वेळी त्यांनी लोकाभिमुख प्रशासन करत असताना कायदेशीर, सनदशीर मार्गानेच कामकाज चालेल असे सांगितले.
First published on: 04-08-2014 at 02:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashwin mudgal new collector of satara