Ashwini Bhide : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (MMRCL) व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत असलेल्या अश्विनी भिडे ( Ashwini Bhide ) यांची बदली करण्यात आली आहे. अश्विनी भिडे आता मेट्रोतून थेट मंत्रालयात गेल्या आहेत. अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अश्विनी भिडे या आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य सचिव असतील. अश्विनी भिडे ( Ashwini Bhide ) यांना पदाचा कार्यभार त्वरित हाती घेण्याचे आदेश दिले आहेत. तसंच पुढील आदेशापर्यंत मेट्रोच्या व्यवस्थापकीय पदाचा कार्यभार सांभाळण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
काय म्हटलं आहे अश्विनी भिडेंना दिलेल्या पत्रात?
अश्विनी भिडे, ( Ashwini Bhide ) शासनाने आपली बदली केली असून, आपली नियुक्ती मा. मुख्यमंत्री यांच्या प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई या पदावर ब्रिजेश सिंह यांच्या जागी करण्यात आली आहे. तरी आपण नवीन पदाचा कार्यभार ब्रिजेश सिंह यांच्याकडून त्वरित स्वीकारावा. पुढील आदेशापर्यंत सध्याच्या पदाचा कार्यभारही आपण धारण करावा.
आपली स्नेहांकीत
व्ही. राधा अपर मुख्य सचिव (सेवा)
असं पत्र अश्विनी भिडे ( Ashwini Bhide ) यांना देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचा पदभार हा ब्रिजेश सिंह यांच्याकडे होता. त्यांच्या जागी आता अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रधान सचिव म्हणून अश्विनी भिडे ( Ashwini Bhide ) काम करतील. मुंबईतल्या आझाद मैदानावर जो सोहळा पार पडला त्यात देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
कोण आहेत अश्विनी भिडे?
आश्विनी भिडे ( Ashwini Bhide ) या १९९५ च्या बॅचच्या आएएस अधिकारी आहेत. त्यांना सनदी सेवेतील २५ वर्षांचा आहे. मुंबई मेट्रोचे जाळे निर्माण करण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांना मुंबई मेट्रो वुमन म्हणून देखील ओळखले जाते. आता त्यांची बदली करण्यात आली असून, त्या मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयाचा पदभरा सांभाळणार आहेत.
श्रीकर परदेशी यांचीही नुकतीच केली होती बदली
राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर मोठे निर्णय घेण्यात येत आहेत. २००१ च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी श्रीकर परदेशी यांची बदली करण्यात आली आहे. श्रीकर परदेशी यांना मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. परदेशी यांनी यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम केलं आहे. श्रीकर परदेशी यांनी प्रतिनियुक्तीवर पीएमओमध्ये देखील काम केलं आहे. श्रीकर परदेशी आता मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून काम पाहतील. यापूर्वी १२ जुलै २०२२ रोजी श्रीकर परदेशी यांची तत्कालीन उपमुख्यमंत्र्याचे उपसचिव म्हणून बदली करण्यात आली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते. म्हणजेच आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. श्रीकर परदेशी भारतीय प्रशासकीय सेवेतील २००१ च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. त्यांनी विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त म्हणून काम केलं आहे. ते नांदेडचे जिल्हाधिकारी होते. याशिवाय पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून देखील त्यांनी काम केलं होतं.