अलिबाग : अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबई-पुण्याहून कोकणच्या वाटेवर निघालेल्या लाखो गणेशभक्तांचा प्रवास यंदा काहीसा सुकर होण्याची चिन्हे आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील काँक्रिटीकरण न झालेल्या रस्त्यांचे युद्धपातळीवर डांबरीकरण करण्यात येत असून येत्या दोन दिवसांत ती कामे पूर्ण होतील, असा यंत्रणांचा दावा आहे. मात्र, या दरम्यान मुसळधार पाऊस झाल्यास त्या माऱ्याने डांबरीकरण उघडे पडून पुन्हा रस्ते खड्डेमय होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

येत्या शनिवारी गणरायाचे आगमन होणार असून कोकणातील पारंपरिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई, ठाण्यातून हजारो कुटुंबे बुधवारी (दि. ४) रात्रीपासून वेगवेगळ्या वाहनांतून कोकणात जायला (पान १२ वर)(पान १ वरून) निघणार आहेत. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील काही पट्ट्यांतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण यंदाही पूर्ण झालेले नाही. यावरून गेल्या काही दिवसांपासून आंदोलने सुरू झाली होती. तसेच यंदाही कोकणातील प्रवास त्रासदायक ठरण्याची शक्यता व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामार्गाची पाहणी केली. त्यानंतर महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदारांनी व्यापक प्रमाणात रस्त्याच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. ज्या ठिकाणची कामे रखडली आहेत तिथे खड्डे बुजवून डांबरीकरण करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील टेम्पाले ते लोणेरे या पट्ट्यात पुलाचे काम रखडले असल्याने, या ठिकाणी पेव्हर ब्लॉक्स टाकून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. टेम्पाले येथील उड्डाणपूल लहान वाहनांसाठी तात्पुरता खुला करण्यात आला आहे. वडखळ ते नागोठणे या मार्गावरील एका मार्गिकेच्या काँक्रीटीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. उर्वरित ठिकाणी रस्ता सुस्थितीत आणला जात आहे. कशेडी घाटातील दुसरा बोगदाही तात्पुरत्या स्वरूपात खुला करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
uddhav thackeray eknath shinde ladki bahin yojana (1)
Uddhav Thackeray on Ladki Bahin Yojana: “हवंतर तुमचे आवडते इव्हेंट करा, पण…”, ठाकरे गटाची सरकारकडे मागणी!
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue: ‘… तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला नसता’, नितीन गडकरींनी दाखवली ‘ती’ चूक
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Raigad, Mumbai-Goa highway,
रायगड : संतापलेल्या आंदोलकांनी मुंबई गोवा महामार्ग रोखला
Traffic jam on Mumbai-Goa highway people going to Konkan got stuck near Lonere
मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, कोकणात जाणारे गणेश भक्त लोणेरे जवळ अडकले
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…

हेही वाचा >>>बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : जनक्षोभाला बळी पडून घाईने आरोपपत्र दाखल करू नका, उच्च न्यायालयाने एसआयटीला बजावले

रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येत असल्याने वाहनचालक, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या कालावधीत जोरदार पाऊस झाल्यास त्यात डांबरी रस्त्यांचे पुन्हा नुकसान होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचे उपाध्यक्ष पराग लाड यांनी बुधवारी पळस्पे ते माणगाव दरम्यानच्या महामार्गाची पाहणी केली जाईल, असे सांगितले. या वेळी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनाही बरोबर घेणार असल्याचे ते म्हणाले.

बसस्थानके शहराबाहेर

माणगाव, इंदापूर येथील बाह्यवळण रस्त्यांची कामे रखडली असल्यामुळे या पट्ट्यात वाहतूक कोंडी निर्माण होते. हे टाळण्यासाठी या दोन्ही ठिकाणची एसटी बसस्थानके गणेशोत्सव काळात शहराबाहेर स्थलांतरित करण्यात आली आहेत. मुंबईतून ५ हजार बसगाड्या बुधवारी रात्रीपासून कोकणात जायला निघणार आहेत. त्यापैकी जवळपास अडीच हजार बसगाड्या पाच तारखेला रवाना होण्याची शक्यता आहे.

ड्रोनची मदत

कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे या पट्ट्यांत वाहतूक नियमनासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. ज्या ड्रोन्सवर पोलिसांना वाहनचालकांना सूचना करण्याचे निर्देश देण्याची सुविधा असणार आहे. ज्यामुळे वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना ड्रोनमधून उद्घोषणा करण्याचे निर्देश देऊ शकणार आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.

महामार्गावर चोख बंदोबस्त

● साडेतीनशे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, ७५ वाहतूक पोलीस आणि ५० गृहरक्षक दलाचे जवान तैनात

● महामार्गावर राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या

● दहा ठिकाणी प्रवासी सुविधा केंद्रांतून मोफत चहा, नाश्ता, वाहन दुरुस्ती, पोलीस मदतीची सुविधा

● अवजड वाहतुकीवर निर्बंध