कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीचे वारे तापू लागले असून ती बहुरंगी होण्याची चिन्हे आहेत. मुख्य लढत काँग्रेसच्या जयश्री जाधव आणि भाजपाचे सत्यजित कदम यांच्यात होण्याची शक्यता आहे. असं असतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीमध्ये कोल्हापूरकर मोदींच्या नावाने भाजपाला मतं देतील असं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “मला उद्धव ठाकरेंची कुंडली पहायची आहे, काय भाग्यवान…”; चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

लोक म्हणतात काही सांगायची आवश्यकता नाही…
“नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सत्यजित कदम यांना आहे. मुळात मोदी माणसांच्या मनामनामध्ये विराजमान झालेले आहेत. लोक म्हणतात मोदी, मोदी, मोदी… काही सांगायची आवश्यकता नाही,” असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
Sanjay Raut on bmc elections
Sanjay Raut : मुंबई पालिकेत ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, इतर शहरांचं काय? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”

विकासकामांच्या आधारे जिंकतील…
विकासाच्या कामांवर सत्यजित कदम विजयी होतील, असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलाय. “खरं तर या घराण्यामध्ये ३० वर्ष नगरसेवक पद आहे. यांचे वडील शिवाजीराव कदम महापौर होते. शिवाजीराव कदमांपासून नारायण कदमांपर्यंत या शहराची खूप सेवा त्यांनी केलीय आणि आमदार असताना खूप सेवा करतील,” असं चंद्रकांत पाटलांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय.

या एका मुद्द्यावर मतं देतील…
“पाच वर्षांचं सरकार असताना फार सांगायचा नको पण ४७६ कोटी सरकारी तिजोरीतून कॉन्ट्रॅक्ट देऊन या शहराचा ३० वर्षाचा टोल आपण घालवलात. या एका मुद्द्यावरसुद्धा कोल्हापूरकर भारतीय जनता पार्टीला मतं देतील,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “किरीट सोमय्या भ्रष्टाचाऱ्यांचा कर्दनकाळ, महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी…”; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

पोटनिवडणूक का?
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे डिसेंबर महिन्यात निधन झाले. या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांच्यासाठी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे होते. मात्र त्याला प्रथम शिवसेना नंतर भाजपाने दाद दिली नाही.

मैत्रीपूर्ण लढत करण्यास काँग्रेसचा विरोध
या मतदारसंघात यापूर्वी निवडून आलेले शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी महाविकास आघाडी अंतर्गत मैत्रीपूर्ण लढत व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार असल्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. तर मैत्रीपूर्ण लढत करण्यास काँग्रेसचा विरोध असून महाविकास आघाडीचा एकच उमेदवार आखाड्यात असावा या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. या अंतर्गत जयश्री जाधव यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे.

नक्की वाचा >> “महाराष्ट्राचं सरकार राष्ट्रवादी चालवतंय, शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांनी, नेत्यांनी फक्त…”; चंद्रकांत पाटलांचा टोला

भाजपाकडून सत्यजित कदम
कोल्हापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाल्याने पोटनिवडणूकही त्याच मार्गाने जाणार का? अशीही चर्चा कोल्हापुरात रंगली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी हे फेटाळले आहे. विधान परिषदेच्या तीन जागांसाठी चर्चा होऊन महाविकास आघाडी व भाजपा यांच्यात निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला होता. आता कोल्हापुरात ती शक्यता नाही. माजी नगरसेवक सत्यजित कदम व देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव ही दोन नावे केंद्रीय समितीकडे पाठवली आहेत. त्यात सत्यजित कदम यांच्या नावाला प्राधान्य राहणार आहे. पाच राज्यातील निवडणुकीचा कल पाहता मतदार काँग्रेस विरोधात असल्याने या निवडणुकीत भाजपाचा विजय होईल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी मागील आठवड्यामध्येही केला होता.

बहुरंगी लढत
जयश्री जाधव – सत्यजित कदम यांच्या जोरदार लढत होणार हे स्पष्ट असताना अन्य काही पक्षांनी रिंगणात उतरण्याचे ठरवले आहे. पंजाब विधानसभा निवडणुकी सत्ता मिळवल्याने आम आदमी पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. आपचे संदीप देसाई यांनी आज प्रचाराला सुरुवात केली. रघुनाथ पाटील यांच्या शेतकरी संघटनेचे उमेदवार बाळ नाईक यांनी आज प्रचार नियोजन बैठक घेतली. शिवसंग्राम पक्षाच्यावतीने करुणा शर्मा या महिलांचा मुद्दा घेऊन लढत देणार आहेत. तर साताऱ्याचे अभिजित बिचुकले यांनीही निवडणूक लढविण्याचा इरादा व्यक्त केला आहे. बऱ्याच अपक्षांनीही अर्ज भरण्याची तयारी ठेवली आहे.

Story img Loader