सांगली : जिल्ह्यातील आठपैकी पाच जागांवर महायुतीने विजय संपादन करून जिल्ह्यावर वर्चस्व निर्माण केले आहे. आता नव्या सरकारमध्ये महायुतीमधून मंत्रीपदासाठी चार जणांची दावेदारी होत आहे. यामध्ये सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर आणि सुधीर गाडगीळ यांची नावे पुढे आहेत.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करत महायुतीच्या उमेदवारांनी घवघवीत यश संपादन केले. मिरज, सांगली, शिराळा आणि जत या मतदार संघात भाजपने यश मिळवले, तर शिवसेना शिंदे पक्षाने खानापूरमध्ये यश संपादन केले. तर इस्लामपूरमध्ये आमदार जयंत पाटील यांचे लाखाचे मताधिक्य बारा हजारापर्यंत खाली आणले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात झालेल्या सरळ लढतीमध्ये विजय संपादन करतांना आमदार पाटील यांना बराच प्रयत्न करावा लागला. पलूस-कडेगावमध्ये माजी मंत्री आ. डॉ. विश्वजित कदम यांना विजयासाठी झगडावे लागले. जर या ठिकाणी क्रांती कारखान्याचे लाड कुटुंब सोबत नसते तर कदमांचाही विजय अवघड होता, असे सांगण्यात येत आहे. तर त्यांचे मावसबंधू विक्रम सावंत यांचा जत मतदार संघात आमदार गोपीचंद पडळकर यांनी पराभव केला.

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Bigg Boss 18
अशनीर ग्रोव्हरच्या ‘त्या’ वक्तव्यावर भडकला सलमान खान; विचारले खरमरीत प्रश्न
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
Panvel issue of commuters loot of passengers Panvel,
पनवेल : प्रवाशांच्या समस्यांचा मुद्दा प्रचारातून गायब, रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट, असुरक्षित प्रवासाबाबत सर्वपक्षीय नेते गप्पच
Devendra Fadnavis, Sandeep Naik, Khairane MIDC office,
फडणवीस यांचे संदीप नाईकांना आव्हान, खैरणे एमआयडीसी कार्यालयात पत्रकार परिषद
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त

हेही वाचा…Eknath Shinde: मुख्यमंत्रीपदाबाबत साशंकता, एकनाथ शिंदे यांचे मध्यरात्री शिवसैनिकांना भावनिक आवाहन; म्हणाले…

आता नव्याने निवडून आलेल्या महायुतीतील आमदारांना मंत्रीपदाचे वेध लागले आहेत. शिराळ्यातून निवडून आलेले सत्यजित देशमुख, खानापूरचे सुहास बाबर हे पहिल्यांदाच विधानसभेत प्रवेश करत आहेत, तर सांगलीचे गाडगीळ यांची आमदार होण्याची तिसरी वेळ आहे. मंत्री खाडे हे सलग पाचव्यांदा निवडून आले असल्याने त्यांना ज्येष्ठत्व म्हणून मंत्रीपद दिले जाण्याची चिन्हे तर आहेतच, यापूर्वी ते जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री होते. आता त्यांच्याकडे कोणता विभाग दिला जातो, याची उत्सुकता आहे. तर गाडगीळ यांना मंत्री करावे असा आग्रह मूळच्या भाजप कार्यकर्त्यांचा आहे. आ. पडळकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटचे मानले जात असल्याने त्यांनाही मंत्रीपदाची आस आहे.

शिवसेनेत फूट पडली त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोबत जाण्यामध्ये स्व. अनिल बाबर पहिले आमदार होते. यामुळे त्यांना शिंदे मंत्रीमंडळात मंत्रीपद मिळेल असे वाटत होते. मात्र, ते वंचित राहिले. यामुळे त्यांचे पुत्र सुहास बाबर यांना राज्यमंत्रीपद मिळेल, अशी आशा खानापूर मतदार संघातील कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.