विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी सुरू आहे. शिवसेना ( ठाकरे गट ) वकील देवदत्त कामत यांच्याकडून शिंदे गटातील आमदार आणि खासदारांची उलटतपासणी साक्ष नोंदवण्याचं काम सुरू आहे. यातच आमदार रोहित पवारांनी विधानसभा अध्यक्षांबाबत मोठं विधान केलं आहे. अध्यक्षांनी एकनाथ शिंदेंच्या विरोधात निर्णय दिला, तर राजकीय फटका बसू शकतो. म्हणून विधानसभा अध्यक्ष राजीनामा देऊ शकतात, असा दावा रोहित पवारांनी केला आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

रोहित पवार म्हणाले, “संविधानानुसार अध्यक्षांना निर्णय घ्यायचा झाला, तर तो एकनाथ शिंदेंच्या विरोधात जाणार आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली, तर राजकीय अडचण होऊ शकते. त्याचा लोकसभा निवडणुकीत फटका बसू शकतो. निर्णय घेण्याची वेळ आल्यावर विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा दिल्यास आश्चर्य वाटायला नको.”

Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
MLA Sunil Raut and Uttamrao jankar
Uttamrao Jankar: मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी आमदारकी सोडणार, शपथविधीच्या दिवशीच उत्तमराव जानकरांची मोठी घोषणा
Mayawati expels BSP leader Surendra Sagar
Surendra Sagar Expels : ‘बसपा’च्या नेत्याला ‘सपा’च्या आमदाराशी सोयरीक करणं पडलं भारी; मायावतींनी पक्षातून केली हकालपट्टी
CM Devendra Fadnavis IMP Statement About Ladki Bahin Scheme
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचं वक्तव्य, “२१०० रुपये…”
Nana accepted Phukes challenge stating he will resign if voting is done on ballot paper
भंडारा :नाना पटोले म्हणतात,’मी राजीनामा द्यायला तयार पण…’

“न्यायालयच न्याय देऊ शकेल”

“त्यानंतर नवीन अध्यक्षांची निवड होण्यासाठी वेळ जाईल. तेव्हा सरकारकडून वेळकाढूपणा केला जाऊ शकतो. एकनाथ शिंदेंच्या विरोधात अध्यक्षांनी निर्णय दिला, तर राजकीय फटका बसू शकतो. म्हणून विधानसभा अध्यक्ष राजीनामा देऊ शकतात. विधानसभा अध्यक्ष न्याय देऊ शकतील, असं वाटत नाही. न्यायालयच न्याय देऊ शकेल,” असं रोहित पवारांनी सांगितलं.

हेही वाचा : ‘‘शिवाजी महाराज सुरत लुटायला गेले, तुमच्यासारखे…” अंबादास दानवे यांची शिंदे गटावर टीका; म्हणाले, “छत्रपतींचा अपमान करण्याची…”

“अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतो”

“पीएचडी करून पोर काय दिवे लावणार?” असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं आहे. याबद्दल बोलताना रोहित पवारांनी म्हटलं, “युवकांबद्दल कुणीही शंका घेतली नाही पाहिजे. गरीब मुलांना पीएचडीचा अभ्यास करताना राहायला पैसे नसतात. म्हणून ती मुलं सरकारकडे येतात. एखाद्या श्रीमंताचा मुलगा सरकारकडे आला असता का? क्षमता असलेल्या मुलांवर तुम्ही शंका घेत असाल, तर योग्य नाही. त्यामुळे अजित पवारांच्या वक्तव्याचा मी निषेध व्यक्त करतो.”

हेही वाचा : मलिक यांच्यावरून फडणवीस यांचा गैरसमज! आता विषय संपला; अजित पवार यांची सारवासारव

“योजनासांठी शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारावे लागतात”

“शेती आणि शिक्षणाची अवस्था वाईट झाली आहे. राज्यात बेरोजगारी वाढली आहे. सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाहीत. विहीर, घरे, रोजगार हमीसारख्या योजनांसाठी शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारावे लागतात. यातून मार्ग निघाला पाहिजे,” अशी मागणी रोहित पवारांनी सरकारकडे केली आहे.

Story img Loader