अलिबाग : समुद्र किनाऱ्यावर एटीव्हीच्या अपघाताची एक चित्रफीत सोमवारी समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारीत झाली. या अपघातात उंटासह तीन ते चार पर्यटकही जखमी झाले आहेत. त्यामुळे समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या या चित्रफीतीमुळे समुद्र किनाऱ्यांवर बेकायदेशीरपणे चालविण्यात येणाऱ्या एटीव्हीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. ज्यात एका एटीव्हीवरचा (ऑल टरेन व्हेईकल) चालकाचा ताबा सुटतो. त्यामुळे एटीव्ही बाईक एका हाताला धडक देऊन समोर उभ्या असलेल्या उंटाला जोरात जाऊन धडकते. या अपघातात एटीव्हीवर बसलेली महिला खाली पडते, आणि जखमी उंट घाबरून सैरा वैरा धावू लागतो. उंटावर बसण्याच्या प्रयत्नात असलेली एक महिला जोरात खाली पडते. एटीव्हीवर बसलेले एक चालक आणि त्याच्या सोबत बसलेला लहान मुलगाही या अपघातात किरकोळ जखमी होतात. एटीव्हीचा अपघात होण्याची ही पहिली वेळ नाही. यापुर्वीही चालकांचे नियंत्रण सुटल्याने एटीव्ही अपघाताच्या घटना अलिबाग येथे घडल्या आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवर बेकायदेशीरपणे चालविण्यात येणाऱ्या एटीव्ही वाहनांचा प्रश्न चर्चेत आला आहे.

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Kurla accident case CCTV from bus seized Mumbai news
कुर्ला अपघात प्रकरणः बसमधील सीसीटीव्ही ताब्यात, २५ जणांचा जबाब नोंदवला
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
CCTV installation completed two years ago but not fully utilized in the city
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे काम अपूर्णच, ६० कोटी रुपयांचे देयक महापालिकेने रोखले
Shocking video You have never seen such a theft clothes theft caught on cctv goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; अख्ख कुटुंब येतं उभं राहतं अन्…VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा

हेही वाचा : महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचितचा अपमान? प्रवक्ते पुंडकर म्हणाले, “आम्हाला एक-दीड तास बाहेर बसवून…”

एटीव्ही अर्थात ऑल टरेन बाईक या गाड्या खेळण्यांच्या प्रकारात मोडतात, त्यामुळे या गाड्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे रजिस्ट्रेशन लागत नाही. गाड्यांची तपासणी केली जात नाही. कुठल्याही विभागाची व्यवसायासाठी परवानगी घेण्याची गरज पडत नाही. व्यवसायासाठी नियम आणि अटी अस्तित्वात नाहीत, त्यामुळे अनिर्बंध परिस्थितीत हा व्यवसाय किनारपट्टीवर गेल्या चार ते पाच वर्षांपासून फोफावत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : मोठी बातमी! ‘वंचित’च्या प्रयत्नांना यश, महाविकास आघाडीत समावेश; काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादीचे एकमत!

चिंताजनक बाब म्हणजे या वाहनांची नियमित तपासणी केली जात नाही. त्यामुळे धोकादायक अवस्थेत या गाड्या व्यवसायासाठी आणल्या जातात. त्यामुळे अपघात होतात. १० ते १४ वयोगटातील मुलेही या व्यवसायासाठी वापरले जातात. वेगमर्यादेचे उल्लंघन केले जाते. गाड्यांचा आवाज मोठ्याने यावा यासाठी सायलेन्सर मध्ये बदल करून घेतले जातात. यामुळे कानठळ्या बसतील येवढे आवाज या गाड्या करतांना दिसतात.

गाड्या कुठल्या क्षेत्रात चालवाव्यात याचे निर्बंध अस्तित्वात नाहीत. त्यामुळे पर्यटकांच्या मधून कुठेही या गाड्या चालविल्या जातात. चालकाचे नियंत्रण सुटले तर त्या सरळ पर्यटकांना जाऊन धडकतात. त्यामुळे या अनिर्बंध एटीव्ही वाहनांना आवर घालण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.

Story img Loader