कर्जत : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कर्जत मध्ये मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी प्रथमच मिरवणुकी मधून डीजे हद्दपार करण्यात आला आहे. पारंपारिक वाद्य लावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती कर्जत येथे सकल मराठा समाज व सर्व शिवप्रेमी शिवभक्त यांच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. शिवजयंतीच्या निमित्ताने कर्जत शहर शिवमय झाले होते. कर्जत तालुक्यातील प्रत्येक गाव वाडी वस्तीवर तसेच शाळा कॉलेज महाविद्यालय या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये देखील शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज जयंती यांच्या निमित्ताने कर्जत येथे सकल मराठा समाजाचे समन्वयक रावसाहेब धांडे यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले होते. कर्ज शहरातील सर्व मेन रोडवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला भगवे झेंडे लावण्यात आले होते. याशिवाय विद्युत रोोषणाही करण्यात आली होती. सर्व मुख्य रस्त्यांवर भव्य कमानी उभारण्यात आल्या होत्या.

छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा व त्याचा देखावा तयार करण्यात आला होता. आज सकाळी या भव्य दिव्य पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येने नागरिक विद्यार्थी सर्व प्रशासकीय अधिकारी शिवप्रेमी व सकल मराठा समाजाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सकल मराठा समाजाचे समन्वयक रावसाहेब धांडे व पाच मुलींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यानंतर जिजाऊ वंदना झाली. फटाक्यांची आकाशबाजी करून जय भवानी जय शिवाजी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने सर्व परिसर दणाणला होता.

भव्य ८० फूट उंचीचा भगवा झेंडा कर्ज शहरातील मेन रोडवर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवप्रेमींच्या वतीने भव्य असा ८० फूट उंचीचा भगवा झेंडा उभा करण्यात आला. याचे आज सकाळी पूजन करण्यात आले.

डीजेचा दणदणाट नाही

सकल मराठा समाजाची समन्वयक रावसाहेब धांडे व सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये डीजेचा वापर करावयाचा नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. पारंपारिक ढोल ताशा झांजपथक बँड याच प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असणारे सर्व मर्दानी खेळ याचे प्रात्यक्षिक करणारे विद्यार्थी अशा अनोख्या वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

जिजाऊ ब्रिगेड च वतीने दीपोत्सव

शिवजयंतीच्या आदल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जो भव्य देखावा उभा करण्यात आला आहे त्या ठिकाणी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने तालुका अध्यक्ष उज्वला शेळके यांच्या नेतृत्वाखाली भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शेकडो दिवे पेटवून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला.

पर्यावरणाचा संदेश देणारी सायकल रॅली

यावेळी शिवजयंतीच्या निमित्ताने सकल मराठा समाज व सर्व समाजिक संघटना यांच्या वतीने कर्जत शहरांमधून पर्यावरणाचा संदेश देणारी भव्य सायकल रॅली काढण्यात आली. यारा लीला समन्वयक रावसाहेब धांडे यांनी झेंडा यानंतर शहरांमधून ही भव्य रॅली स्वच्छ कर्जत सुंदर कर्जत हरित कर्जत छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत काढण्यात आली.यामध्ये प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर यांच्यासह शाळा कॉलेज महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक व सायकल प्रेमी सहभागी झाले होते.