रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या तरुणीवर जादूटोणा केल्याप्रकरणी पतीपत्नीविरुध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधिताकडून धर्मांतर केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. कथित धर्मांतराच्या विरोधात रविवारी आटपाडी बंद पुकारण्यात आला असून बंदला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
हेही वाचा- सांगलीत दोन मोटारींची समोरासमोर धडक; एक ठार, मोटार जळून खाक
उपचार घेणाऱ्या रुग्णावर जादूटोणा भोंदूगिरीने उपचारासह धर्मांतराचा आरोप असलेला संजय गेळे व अश्विनी गेळे या पती-पत्नीवर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. गेळे कुटुंबाने केलेल्या धर्मातर प्रकारच्या निषेधार्थ आज रविवारी आटपाडी शहर बंदची हाक दिली आहे. या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आटपाडीमधील बाजारपेठ बंद असल्यामुळे पेठेत शुकशुकाट आहे. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. जादूटोणा करणारे आणि लोकांचे धर्मांतर करणाऱ्याना अटक करून कडक कारवाई करावी या मागणीसाठी आटपाडी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलं आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी हे आंदोलन केले आहे.
हेही वाचा- तक्रारदार महिलेकडून ब्लॅकमेलिंग, खोटे फोटो दाखवून बदनामी करण्याचा प्रयत्न; राहुल शेवाळेंचा दावा
आटपाडी येथील गेळे दांपत्यांने आपल्या अंगी दिव्य शक्ती असल्याचे भासविले. जादूटोणा करून रुग्ण बरा करण्याच्या उद्देशाने वरद हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात रुग्णांचे नातेवाईक असल्याची खोटी माहिती दिली. अतिदक्षता विभागात विनापरवानगी प्रवेश केला. उपचार घेत असलेल्या सोनाली शिवदास जिरे (१८, रा. मापटेमळा आटपाडी) हिच्या कपाळावरून बोटे फिरवून टॅबमधील मजकूर वाचून बोटाने शस्त्रक्रिया करीत असल्याचे भासवले. या घटनेणची चित्रफितही समाज माध्यमावर प्रसारीत झाली.
या प्रकरणी जादूटोणा, भोंदूगिरी केल्याची फिर्याद संपतराव नामदेव धनवडे यांनी दिली आहे. त्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. परंतु धर्मांतराचा विषय गंभीर असून या प्रकरणी कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज बंदचे आवाहन करण्यात आले होते.