सोलापुरातून संशयित तरुणांना दहशतवादाप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेऊन घरझडतीसह केलेली कारवाई न्यायतत्त्वावर नसून दडपशाहीची आहे, त्यात पारदर्शकता नाही. पोलिसांनी कायद्याची उघडपणे पायमल्ली केली आहे, असा आरोप या संशयित दहशतवाद्यांच्या घरच्या मंडळींनी केला आहे. म. सादिक लुंजे याच्या घरात तर झडती घेताना कोणत्याही आक्षेपार्ह वस्तू सापडल्या नसताना पोलिसांच्या पथकाने घरातील प्रत्येक वस्तूची अक्षरश: नासधूस केली. निष्पाप लहान मुलांची खेळणी तोडली, मुलींच्या पैशाचा गल्लाही फोडला, असा आरोप सादिकच्या पत्नीने केला.
तीन दिवसांपूर्वी शहरातील म. सादिक अ. वहाब लुंजे व उमेर अ. हाफिज दंडोती या दोघा संशयितांना मध्य प्रदेशच्या दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन शक्तिशाली बॉम्बसह जिलेटिन कांडय़ा, डिटोनेटर्स, गावठी पिस्तूल, काडतुसे,तसेच संगणक, प्रिंटर, पेनड्राईव्ह आदी माल हस्तगत केला. या खळबळजनक घटनेमुळे स्थानिक पोलीस यंत्रणेसह समस्त सोलापूरकर हादरले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा