परिवर्तन चळवळीतील ज्येष्ठ नेते, भाकपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य अॅड. कॉ. गोिवद पानसरे व त्यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्यां उमा पानसरे यांच्यावर सोमवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला. दुचाकीवरून आलेल्या बुरखाधारी हल्लेखोरांनी पिस्तुलातून पानसरे दाम्पत्यावर गोळीबार केला. या दोघांनाही घराजवळच असलेल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोघांचीही प्रकृती गंभीर पण स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली असून पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांसह लोकप्रतिनिधींनी रुग्णालयात धाव घेऊन पानसरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. रुग्णालयाजवळचे वातावरण तणावपूर्ण होते. गृहराज्यमंत्री राम िशदे हे रुग्णालयातून बाहेर पडत असताना कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या.
पानसरे दाम्पत्य पुरोगामी चळवळीचा आधारवड मानले जातात. सोमवारी सकाळी ९ वाजता दोघेही फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले होते. ते घराजवळ पोहोचले असतानाच दुचाकीवरून आलेल्या बुरखाधारी हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. गोळ्या झाडून क्षणार्धात हल्लेखोर पळून गेले. पानसरे दाम्पत्यावर हल्ला झाल्याचे समजताच घटनास्थळी गर्दी जमली. जखमी पानसरे दाम्पत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पानसरे यांना तीन गोळ्या लागल्या. त्यापैकी गळ्यात घुसलेली गोळी शस्त्रक्रियेने काढण्यात आली असून सायंकाळी कंबरेजवळ घुसलेली गोळी काढण्यासाठी वैद्यकीय पथक कार्यरत होते. त्यांची प्रकृती स्थिर, पण गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. उमा पानसरे यांच्या डोक्याला चाटून गोळी गेली असून या भागाची शस्त्रक्रिया डॉक्टरांनी केली.
दरम्यान, गृहराज्यमंत्री शिंदे रुग्णालयातून बाहेर पडत असताना पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवून घोषणाबाजी सुरू केली. धिक्काराच्या घोषणा दिल्या जात असताना काहींनी गाडीच्या दिशेने चप्पल फेकली. तोवर तेथे दाखल झालेले खासदार राजू शेट्टी यांना पाहून कार्यकर्त्यांनी त्यांच्याही निषेधाच्या घोषणा दिल्या.
तपासासाठी १० पथके रवाना
* गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी सायंकाळी
साडेचार वाजता रुग्णालयात येऊन डॉक्टरांशी चर्चा केली. उपचार व तपासाची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.
* गृहराज्यमंत्री म्हणाले, पानसरेंवरील हल्ला कशासाठी झाला याचा सर्व अंगांनी तपास केला जात आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याप्रमाणेच हल्ला झाला असून यामागेही नेमकी कोणती प्रवृत्ती आहे याचा शोध घेतला जात आहे.
* तपासासाठी १० पथके रवाना झाली आहेत. आवश्यक तर दहशतवाद प्रतिबंधक विभाग, सीआयडी यांचीही मदत घेण्यात येईल. पण पोलिसांना तपासासाठी वेळ दिला जात आहे.
* पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांवर हल्ले होत असून अशा व्यक्तींनी मागणी केल्यास त्यांना संरक्षण देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
फोटो गॅलरी : गोविंद पानसरेंवर हल्ला
कॉ. पानसरे यांच्यावरप्राणघातक हल्ला
परिवर्तन चळवळीतील ज्येष्ठ नेते, भाकपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य अॅड. कॉ. गोिवद पानसरे व त्यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्यां उमा पानसरे यांच्यावर सोमवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला.
आणखी वाचा
First published on: 17-02-2015 at 01:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attack on govind pansare in kolhapur