रत्नागिरी : रत्नागिरी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांच्यावर मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास शहरातील गोडबोले स्टॉपनजिक हल्ला करण्यात आला आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांच्यावर झालेला हा हल्ला पक्षांतर्गत वादातून झाला असावा अशी चर्चा सदया रत्नागिरीत सुरु आहे. या हल्ल्यात पक्षातीलच एका नेत्याचा हात असल्याचा आरोप रुपेश जाधव यांनी केला आहे. दरम्यान या प्रकाराने रत्नागिरी शहरात खळबळ उडाली आहे. मनसे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव हे मंगळवारी आपल्या गोडबोले स्टॉप येथील कार्यालयात बसले होते. रात्री नऊ वाजता कार्यालय बंद करुन ते बाहेर पडले.

Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Cash theft of four lakhs by breaking the door of the clothing store pune news
वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी
government contractor killed over two crores extortion money
दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून; ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक; मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यंगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?
supreme court ask government for treatment of bedridden youth
तरुणाच्या कुटुंबीयांसाठी सर्वोच्च न्यायालय मदतीला; अकरा वर्षांपासून अंथरुणाशी खिळलेल्या तरुणावर आता सरकारी उपचार

हे ही वाचा…Hasan Mushrif on Sharad Pawar: “पवार साहेब तुमच्याशी वैर नाही, समरजित आता तुझी…”, हसन मुश्रीफांचे प्रत्युत्तर

यावेळी मागून येणाऱ्या चार ते पाच जणांनी त्यांच्यावर लाठ्या काठ्या घेऊन हल्ला केला. यावेळी रुपेश जाधव यांना या लोकांकडून बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. जखमी अवस्थेत रुपेश जाधव यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे ही वाचा…Maharashtra News Live : मविआचं मुख्यमंत्रिपदाचं घोडं कुठे अडलंय? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

यावेळी त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. पक्षातील एका वरिष्ठ नेत्याच्या सांगण्यावरुन हा हल्ला केला गेला असल्याचा आरोप जखमी रुपेश जाधव यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रत्नागिरी पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली असून हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला..