हिंदुस्तान प्रजा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फलटण येथील दै. ऐक्य आणि सकाळ वृत्तपत्राच्या कार्यालयांवर हल्ला केला. फलटण शहर पोलिसांत याबाबात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गुटख्याची विक्री करत असल्याच्या संशयावरून फलटण पोलिस ठाण्याचे अधिकारी हणमंत वारे यांनी हुसेन खुदाबक्ष महात (वय ४५) यांना शुक्रवारी अटक केली होती. चौकशी दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यामुळे वातावरण तंग झाले. शनिवारी या प्रकरणावरून सर्वपक्षीय बंद ठेवण्यात आला तर मृतांच्या नातेवाइकांनी वारे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली होती. वारे यांची यात बदली झाली होती. तसेच गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर हिंदुस्तान प्रजा पक्ष या संघटनेने वारे यांची बाजू घेणारी पत्रके सर्व वृत्तपत्रांना दिली. मात्र या पत्रकांना कोणी प्रसिद्धी दिली नाही. याचा राग मनात धरून हिंदुस्तान प्रजा पक्षाचा गणेश महाराज शिंदे याने आणि त्याच्या साथीदाराने दै. ऐक्य आणि सकाळच्या कार्यालयावर हल्ला केला. येथील कर्मचारी वर्गाला धमकावत कार्यालयाच्या साहित्याची तोडफोड केली. फलटण पोलिसांत दोन्ही वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी तक्रारी दिल्या असून गणेश शिंदे याला अटक करण्यात आली आहे. तर त्याचा साथीदार पंढरपूरकडे पळून गेला आहे.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा