तालुक्यातील ओझरखेड येथे दोघांवर प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या संशयितास दोन महिन्यांनंतर पकडण्यात वणी पोलिसांना यश आले. ओझरखेड येथे आठ ऑक्टोबर रोजी चेतन नारायण जाधव व नितीन जाधव कुटुंबीयांसह घराच्या ओटय़ावर बसले असताना पिनु गाडे (२६) हा त्याच्या छतावर उभे राहून चेतनच्या आईस शिवीगाळ करू लागला. दोघे भाऊ विचारणा करण्यास गेले असता गाडे याने त्यांच्यावर कात्रीने वार केले. या हल्ल्यानंतर तो फरार झाला. तेव्हापासून वणी पोलीस त्याचा शोध घेत होते. गाडे याचा सासरा आणि पोलिसांच्या खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताची पत्नी कादवा म्हाळुंगी येथून पतीला भेटण्यासाठी बसने जात असता प्रकाश रिकामे या पोलिसाने पाठलाग करत निफाड तालुक्यातील पालखेड येथे गाडे यास ग्रामस्थांच्या मदतीने पकडले. त्यास वणी येथे आणण्यात आले. न्यायालयात त्यास उपस्थित करण्यात आले असता १८ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा