हिंगोली शहरातील बियाणीनगर भागात दिवसाढवळ्या पिस्तुलचा धाक दाखवून चोरट्यांनी चोरी केली. मुद्देमालासह आरोपींना पकडण्यात हिंगोली पोलिसांना यश आले. या घटनेची चर्चा थांबते ना थांबते तोच शुक्रवारी (१४ जानेवारी) गुन्हेगारानी पिस्तुलचा धाक दाखवून आंबा चोंडी येथील मराठवाडा ग्रामीण बँक लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे फसला, ग्रामस्थांच्या मदतीने आरोपींचा पाठलाग करून पोलिसांनी ३ आरोपींना जेरबंद केले. या लगातार घडलेल्या २ घटनांमुळे जनतेत मात्र भीतीचे वातावरण कायम आहे.
हिंगोली जिल्ह्यात घरफोड्या दिवसा ढवळ्या व्यापाऱ्यांची लूट अशा विविध गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. ३० डिसेंबर रोजी शहरातील बियाणी नगर भागात दिवसाढवळ्या अंजली अविनाश कल्याणकर यांच्या घरात ही घटना घडली. आरोपींनी घरात प्रवेश करून पिस्तुलचा धाक दाखवून पीडित महिलेला चाकूने वार कर जखमी केले. तिच्या मुलाला खुर्चीत हात-पाय बांधून ठेवले. घरातून दाग दागिने व रोख रक्कम सुमारे २ लाख ८६ हजाराचा मुद्देमाल पळविला.
व्यापारी महासंघाने गुन्हेगाराचा तपास लावण्याच्यामागणी साठी शहर बंद करूनरस्त्यावरउतरून आंदोलन केले. सदर घटनेतील आरोपी चंद्रकांत दिनकर काकडे (रा. माणकेश्वर तालुका जिंतूर) व नचीकेत राजकुमार वाघमारे भोईपुरा हिंगोली या दोन आरोपींना दोन पिस्तूल, जिवंत काडतूस व चोरीत गेलेल्या मुद्देमालासह जेरबंद केले. या दोन्ही आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
या घटनेची चर्चा थांबते ना थांबते तोच वसमत तालुक्यातील चोंडीआंबा येथील मराठवाडा ग्रामीण बँकपिस्तुला चा धाक दाखवून शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींचा डाव ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे फसला गेला. आरोपीनी बँकेतून पळकाढण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करून त्यांना जेरबंद करण्यात यश मिळविले.
पोलिसांनी या प्रकरणात संदीप मटरू यादव व शाबान जमील अन्सारी दोघे उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील रहिवासी व वसमत शहरातील रहिवासी असलेला आयास अहमद अन्सारीयास ताब्यात घेतले आहे. गुन्हेगारांकडून दिवसा ढवळ्या सर्रास पिस्तुलाचा धाक दाखवून घडणाऱ्या घटनांमुळे जनतेत मात्र भीतीचे वातावरण कायम आहे.