नगर: पीक विम्यासंदर्भातील अडचणींबाबत मुख्यमंत्र्यांनी नुकतीच बैठक घेतली. विमा कंपन्यांनी काही दिवसांची मुदत मागितली आहे. पावसाचा २१ दिवसांचा पडलेला खंड व ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झालेल्या अधिसूचित मंडलातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नगरमध्ये आज, शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आज नाशिकमधील दौऱ्यात राष्ट्रवादीकडून स्वागतासाठी लावलेल्या शुभेच्छाफलकांवरून शरद पवार यांचा फोटो गायब झाला आहे, त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लागला आहे. या संदर्भात मुंडे म्हणाले, की ज्या शरद पवारांना आम्ही दैवत मानतो, त्या देवाने आम्हाला भक्तांना फोटो वापरण्यास मनाई केली आहे. कायदेशीर कारवाई करेल असे सांगितले. मग आम्ही काय करायचे? तेव्हा आमच्यावर कायदेशीर कारवाईची वेळ देवावर येऊ नये म्हणून त्यांच्याऐवजी ते ज्यांना गुरू मानत होते, त्या यशवंतराव चव्हाण यांचे छायाचित्र आम्ही लावले. 

Baramati protests that Pratibha Pawar was prevented from campaigning Inspection of Sharad Pawar bag Pune news
प्रतिभा पवार यांंना प्रचारापासून रोखल्याचे बारामतीत पडसाद; शरद पवार यांच्या बॅगची तपासणी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Sharad Pawar Ajit Pawar fb
“बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही” म्हणणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांचा टोला; म्हणाले…
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…
Rajshree Ahirrao, Devalali, Mahayuti Devalali,
नाशिक : देवळालीत महायुतीतील मतभेद मिटता मिटेना, अजित पवार गटाविरोधात शिंदे गटाचा प्रचार

कांदा व टोमॅटोच्या भावावरून शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना नाशिकमध्ये काळे झेंडे दाखवले. या संदर्भातील प्रश्नावर मंत्री मुंडे यांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केला. ते म्हणाले, की जेव्हा शेतकऱ्यांना ऐतिहासिक २७१० रुपये भाव दिला गेला, त्या वेळेस माध्यमांना ती बातमी करावीशी वाटली नाही. स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व मी अशा तिघांनी बैठक घेतली. आणखी दोन लाख टन कांदा विकत घेण्याचा निर्णय घेतला. या कांद्याला २१५० रुपये भाव देऊन तो विकत घेणार आहोत. हा ऐतिहासिक निर्णय आहे. मात्र, विरोधाला विरोध करायचे व माध्यमे उपद्रव मूल्याला जास्त महत्त्व देऊ लागल्याने उपद्रवमूल्य वाढताना दिसत आहे. त्यामुळेच अशा गोष्टी घडत आहेत, असाही दावा मुंडे यांनी केला.