धाराशिव : बनावट आधारकार्डाच्या आधारे वोटर हेल्पलाईन या मोबाईल अ‍ॅपचा वापर करून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याचा प्रयत्न करणार्‍या ४० जणांविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळजापूर तहसीलदारांनी दिलेल्या तक्रार अर्जावरून ही कारवाई करण्यात आली आहे. ऑनलाईन प्रक्रियेचा वापर करून वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून निवडणूक आयोगाची फसवणूक केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तुळजापूर विधानसभा मतदार संघात २ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाईन पध्दतीचा वापर करून मतदार नोंदणीच्या संख्येत अचानक वाढ झाली. त्यानंतर मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून आलेल्या या अर्जांची पडताळणी केली असता, त्यात अनेक अर्जदारांनी जोडलेल्या आधारकार्डचा नामांकन क्रम एकसारखाच आढळून आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याचबरोबर आधारकार्डवरील फोटो देखील एकसारखेच असून त्यावरील व्यक्तींची नावे मात्र वेगवेगळी असल्याचे समोर आले आहे.

maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Sudhir Mungantiwar, Sudhir Mungantiwar Nagpur,
काँग्रेसची सध्याची अवस्था ‘चाची ४२०’ प्रमाणे, मुनगंटीवार यांची टीका
Kasba Constituency, Ravindra Dhangekar,
विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे : रविंद्र धंगेकर
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
Solapur district bank scam
सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
thane model code of conduct crime loksatta news
आचारसंहिता भरारी पथकाचीच खंडणीखोरी, शेतमालाच्या पैशांवर डल्ला, १३ दिवसांनंतर गुन्हा दाखल

आणखी वाचा-कोजागिरी पौर्णिमेला लाखो भाविकांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन

मतदार याद्यांची प्रक्रिया करणार्‍या केंद्रस्तरीय अधिकार्‍यांनी या बाबींची पडताळणी केली असता संबंधित व्यक्तींनी नमुद केलेल्या पत्त्यांवर त्यांचे अस्तित्व आढळून आले नसल्याचेही यात म्हटले आहे. त्यामुळे त्यांचा मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याचा अर्ज नामंजूर करावा, अशी शिफारस सहाय्यक मतदार नोंदणी अधिकार्‍यांकडे पाठविली आहे. बनावट मतदार म्हणून बनावट कागदपत्रांच्या आधारे भारत निवडणूक आयोगाची ४० जणांनी फसवणूक केली आहे. तोतयेगिरी करणार्‍या या ४० जणांचे नाव, पत्ता आणि ज्या मोबाईल क्रमांकाचा वापर ऑनलाईन नाव नोंदणीसाठी करण्यात आला होता, ते मोबाईल क्रमांकही तक्रारीसोबत जोडण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी अरविंद बोळंगे यांनी दिली आहे.