राहाता : परिवहनमंत्री अनिल परब यांना बुधवारी मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स होते. मात्र त्यांनी आज ईडी ऐवजी साईदर्शनासाठी शिर्डीत हजेरी लावली. मी मुंबई बाहेर असल्याने चौकशीसाठी हजर राहू शकलो नाही. मात्र मुंबईत गेल्यानंतर मी ईडीच्या कार्यालयात जाईल तशी कल्पना ईडी कार्यालयास दिल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

    शिवसेनेचे नेते अनिल परब यांना ईडीने मंगळवारी दिनांक १४ रोजी समन्स बजावले आहे. आज, बुधवारी परब यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र मंत्री अनिल परब हे ईडी कार्यालयात हजर न राहता त्यांनी आज बुधवारी थेट शिर्डी साईदरबारी माध्यान्ह आरतीला हजेरी लावत श्री साई समाधीचे दर्शन घेतले. या वेळी श्री साईबाबांच्या समाधीवर त्यांनी भगव्या रंगाची चादर टाकून श्री साई समाधीची पाद्यपूजा करण्यात आली.

     साईदर्शनानंतर परब म्हणाले की, मला ईडीची नोटिस पाठवली तेव्हा मी बाहेर होतो, शिर्डीनजीक दौरा असल्याने मी नेहमीप्रमाणे साईबाबांच्या दर्शनासाठी आलो आहे. किरीट सोमय्या यांनी काय बोलावे हा त्यांचा प्रश्न आहे. ते काही अधिकारी नाहीत, मला ज्या अधिकाऱ्यांना उत्तर द्यायचे ते मी देईन असेही त्यांनी म्हटले. राज्यसभेच्या निकालावरून त्यांनी बोलताना सांगितले, निवडणुका जिंकण्यासाठी लढायच्या असतात. विधानपरिषदेवर शिवसेनेच्या दोन्ही जागा निवडून येणार असल्याचे सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attendance of sidarbari parab turning blind eye ed summons ysh