वाई: महाबळेश्वर पालिकेच्या वेण्णा तलावात ड्रॅगन, फ्लेमिंगो, राजहंस, बदक आणि मोटार आदी विविध आकारात सुमारे १६ बोटी दाखल झाल्या आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी अनोखा उपक्रम राबवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उन्हाळी हंगामासाठी महाबळेश्वर येथे मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता आहे. पर्यटकांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज आहे. पर्यटकांचे सर्वात आवडते ठिकाण म्हणून वेण्णा लेक ओळखले जाते. पालिका प्रशासनाने  बदक, राजहंस, फ्लेमिंगो, ड्रॅगन व मोटार आदी आकारात सुमारे ५५ बोटी मागवल्या असून त्यातील १६ बोटींचे आज लोकार्पण करण्यात आले. महाबळेश्वर येथे विविध पॉईंट व निसर्ग स्थळे पाहिल्यानंतर सूर्यास्त पाहत बोटिंगचा आनंद घेण्यासाठी वेण्णा लेक येथे पर्यटक येत असतात.

हेही वाचा – हिंदूंना एकमेकांत लढवून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा काँग्रेसचा मनसुबा, योगी आदित्यनाथांचा आरोप

उन्हाळी पर्यटनासाठी महाबळेश्वर येथे पर्यटकांची वर्दळ सुरू झाली आहे. पुढील दीड दोन महिन्यात किमान दहा लाख पर्यटक महाबळेश्वरला येतील अशी प्रशासनाला अपेक्षा आहे. पर्यटकांना नौका विहाराचा जास्तीत जास्त आनंद लुटता येईल या दृष्टीने  बोटक्लब येथे या बोटी दाखल झाल्या आहेत. यावेळी या बोटी पाहण्यासाठी पर्यटकांनी, स्थानिकांनी गर्दी केली होती. यावर्षीच्या कडक उन्हाळ्यातही वेण्णा लेकची पाणी पातळी नौका विहारला साजेशी आहे.

हेही वाचा – फसव्या प्रवृत्तीला खड्यासारखे बाजूला करा – शरद पवार

महाबळेश्वर पर्यटनात वेण्णा लेकचे फार महत्त्व आहे. वेण्णा लेक शहराचे मुख्य प्रवेशद्वार देखील आहे. हे ठिकाण सर्वात चांगले व सुशोभित असले पाहिजे. यासाठी आकर्षक विद्युत रोषणाई झाडांचे सेल्फी पॉईंट उभारले आहेत. विविध आकारात पॅडेल बोटी आणल्या आहेत.  सुशोभीकरणाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांची कमतरता दूर करण्याचे नियोजन आहे. सदरचा परिसर जास्तीत जास्त आकर्षक  करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे पर्यटकांच्या  मनोरंजनास आणखी वाव मिळणार आहे. – योगेश पाटील, मुख्याधिकारी तथा प्रशासक, महाबळेश्वर