एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेत बंड केलं आहे. त्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले आहेत. शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी ‘मातोश्री’ आणि सेनाभवनात भेटी घेत संवाद साधत आहे. त्यातच बुलडाणा जिल्ह्यातील दोन गट उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी ‘मातोश्री’वर आले होते. पण, यातल्या एका गटाला भेट नाकारण्यात आली. यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मातोश्री’वर बुलडाण्यातील दोन शिवसैनिकांचे गट उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आले होते. मात्र, गटबाजीमुळे एका गटाला भेट नाकारण्यात आली. तोच मुद्दा पकडून अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात “हा तर अंधेरी इफेक्ट”, असे म्हणत उद्धव ठाकरेंना चिमटा काढला आहे.

हेही वाचा : “राज्याचे मुख्यमंत्री बोलकं बाहुलं तर फडणवीस…” अरविंद सावंतांची टोलेबाजी, म्हणाले, “४० बंडखोर तर…”

काय घडलं होते?

उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी ८०० किलोमीटरवरून शिवसेनेचे दोन गट आले होते. पण, गटबाजीमुळे त्यातील एका गटाला ‘मातोश्री’वर भेट नाकारली. तेव्हा ‘मातोश्री’बाहेर असलेल्या शिवसैनिकाने थेट राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली. काहीही झालं तरी ठाकरेंची साथ सोडणार नाही, असा निर्धारही शिवसैनिकाने व्यक्त केला आहे. ‘महाराष्ट्र टाईम्स’ने याबाबत वृत्त दिलं होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atul bhatkhalkar taunt uddhav thackeray over buldhana shivsainik denied entry matoshri ssa