प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. लिंगभेद करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हा सत्र न्यायालयाचा आदेश रद्द करत इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी न्यायालयाने इंदुरीकर महाराजांना त्यांची बाजू मांडण्यासाठी ४ आठवड्यांचा वेळही दिला. याबाबत वकिलांनी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत माहिती दिली.
वकील म्हणाले, “इंदुरीकर महाराजांविरोधात पीसीपीएनडीटी कायद्यानुसार संगमनेर जीएमएफसीने कलम १५६ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याला इंदुरीकर महाराजांनी जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिलं. जिल्हा सत्र न्यायालयाने जीएमएफसीचा आदेश रद्द करत इंदुरीकर महाराजांना दिलासा दिला होता.”
व्हिडीओ पाहा :
हेही वाचा : “तिला तीन गाण्यांसाठी काही लाख अन् आम्हाला टाळ वाजवून…” इंदुरीकर महाराजांची गौतमी पाटीलवर अप्रत्यक्ष टीका
“आज (१६ जून) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द केला. तसेच जीएमएफसीने इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा दिलेला आदेश वैध ठरवला आहे,” असंही वकिलांनी नमूद केलं.