दुसऱ्या शिफ्टचे काम आटोपून परकीन कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घरी घेऊन जाणाऱ्या खासगी वाहनाने शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास N-2 मधील कामचौक परिसरातील जयभवानी नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अचानक पेट घेतला. या वाहनात (MH-20/EG-5074) चार कर्मचारी होते. सुदैवाने कर्मचारी तातडीने खाली उतरल्याने जीवित हानी टळली.

चालक ख्वॉजामियाँ कुरेशी यांनी वाहनमालक गुरविंदर शेट्टी घटनास्थळी दाखल झाले. काही नागरीकांच्या सहकार्याने अग्निशमन दलाशी संपर्क साधण्यात आला. चिकलठाणा दलाचे अग्निशमक प्रमुख अशोक खांडेकर हे हरिश्चंद्र पवार, मदन ताठे, अस्लम शेख, प्रवीण पचलुरे, विनोद तुपे या कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. सुमारे अर्धा तास वाहनाची आग विझव्यासाठी लागले, असे अग्निशमक प्रमुख अशोक खांडेकर यांनी सांगितले.

N2 सिडको कामगार चौक येथे रात्री 1.20 वाजता अचानक खाजगी कँपणीच्या बस ला आग लागली.येथील नागरिकांनी मला त्वरित कळविले अग्निशमन विभागाला कळविले.अग्निशमन दल त्वरित तिथे पोहोचले आग विजविली,सुदैवाने ह्यात जीवित हानी झाली नाही,परंतु सर्व बस मात्र ह्यात जळाली. घटनास्थळी बस चे मालक देखील पोहोचले.